मुंबई : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड (Umesh Kolhe Murder case) प्रकरणातील अटकेतील सर्व आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Accused in police custody till July 22) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाचा हा निर्णय दिला आहे. (Of the Special NIA Court in the Mumbai Sessions Court) सोशल मीडियावर नुपूर शर्माना पाठिंबा दर्शविणारी पोस्ट टाकल्याने, (post showing support for Nupur Sharma on social media) उमेश कोल्हे यांची हत्या २१ जून रोजी रात्री उमेश कोल्हे यांचा गळा चिरून हत्या करण्यात आला होती. (umesh kolhe murder on 21 June) दरम्यान, या प्रकरणी त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने तो तपास एनआयएकडे सोपविण्यात होता. पुढे ४ जुलै रोजी अमरावती न्यायालयात अर्ज दाखल करून एनआयएने सातही आरोपींचा ताबा मागितला होता. त्यानुसार सर्वांना चार दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला.
[read_also content=”महाविकास आघाडीत असताना आमदारांचे खच्चीकरण, म्हणून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/when-mla-were-in-the-mahavikas-aghadi-they-decided-to-go-with-bjp-chief-minister-eknath-shinde-304585.html”]
दरम्यान, ७ जुलै रोजी सर्व आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध यूएपीएअन्वये स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आला होता. एनआयएचा युक्तिवाद ग्राह्य धरत सातही आरोपींना १५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आरोपींची कोठडी संपत असल्यानं, यावर आज पुन्हा सुनावणी पार पडली असता, अटकेतील सर्व आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाचा हा निर्णय दिला आहे.