Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये बंधाऱ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. पण वाढीव मोबदल्यासाठी त्यांना तब्बल 4 दशकांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रशासनाने अजूनही रक्कम दिलेली नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 06:52 PM
येवल्यातील नगरसूल

येवल्यातील नगरसूल

Follow Us
Follow Us:
  • ४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! प्रकरण काय?
  • भूसंपादनाच्या मोबदल्यावरून हायकोर्टाचा सरकारला जाब
  • न्यायालयाने काय प्रश्न उपस्थित केला?
Nashik News: विकासासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी तब्बल चार दशकांपासून केवळ उपेक्षाच आली आहे. येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये एका बंधाऱ्यासाठी अधिग्रहित केल्या होत्या, परंतु आज २०२६ उजाडले तरी त्यांना वाढीव मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही. या गंभीर दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

काय आहे ४० वर्षांचा हा वनवास?

१९८५ मध्ये नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने बंधाऱ्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या. १९९० मध्ये शासनाने या जमिनीसाठी केवळ १० हजार रुपये प्रति हेक्टर इतका नाममात्र मोबदला जाहीर केला होता. या तुटपुंज्या रकमेविरुद्ध शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. १९९७ मध्ये जिल्हा न्यायालयाने हा मोबदला वाढवून ३० हजार रुपये प्रति हेक्टर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने ही रक्कम देण्याऐवजी उच्च न्यायालयात अपील करून हा लढा लांबवला. जून २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने सरकारचे अपील फेटाळल्यानंतरही मोबदला मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा रिट याचिका दाखल केल्या.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारवर ओढले ताशेरे

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम सिरसाट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारला धारेवर धरताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जमिनीचा योग्य मोबदला वेळेत मिळणे हा जमीन मालकांचा घटनात्मक हक्क आहे.” जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतरही ३० वर्षे मोबदला का दिला गेला नाही? असा संतप्त सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला.

आजच्या बाजारभावानुसार मोबदल्याची मागणी

शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. एकनाथ ढोकळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. “ज्या जमिनी १९८५ मध्ये घेतल्या, त्यांचा मोबदला १९९७ च्या दराने २०२६ मध्ये देणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. ३० वर्षांपूर्वीच्या रुपयाची किंमत आणि आजची महागाई यात जमीन-अस्मानाचा फरक आहे,” असे वकीलांनी नमूद केलं. त्यामुळे या जमिनींचा मोबदला आताच्या चालू बाजारभावानुसार निश्चित करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

पुढील सुनावणी २३ मार्चला

उच्च न्यायालयाने सरकारला आता शेवटची संधी देत ४ आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. या निर्णयामुळे केवळ नगरसूलच नव्हे, तर राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिकमध्ये ‘मनमर्जी’ अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा दणका! महासभेत नव्या-जुन्या सदस्यांनी अधिकाऱ्याला प्रश्नांत घेरलं…

Web Title: Yeola nagarsul farmers land compensation case high court order state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • farmer
  • Government
  • Nashik News

संबंधित बातम्या

PM-SYM Scheme : भन्नाट योजना…! रोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करा, 60 वर्षांनंतर मिळवा दर महिना 3000 ची गॅरेंटी
1

PM-SYM Scheme : भन्नाट योजना…! रोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करा, 60 वर्षांनंतर मिळवा दर महिना 3000 ची गॅरेंटी

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
2

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
4

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.