Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

आयटी कायद्याचे कलम ६९-ए केंद्र सरकारला विशिष्ट कारणास्तव माहिती बलॉक करण्याचे अधिकार देते. या प्रक्रियेसाठी २००९ चे नियम लागू होतात,

  • By anuradha sagar
Updated On: Feb 22, 2026 | 11:04 AM
Supreme Court, Justice Delayed is Justice Denied, Supreme Court Legal Reforms 2026, Pending Cases India, Indian Judiciary New Rules.

Supreme Court, Justice Delayed is Justice Denied, Supreme Court Legal Reforms 2026, Pending Cases India, Indian Judiciary New Rules.

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडिया किंवा इंटरनेटवरील कोणताही मजकूर (Content) हटवण्याचे आदेश देण्याचा अधिकार ‘मॅजिस्ट्रेट’ (कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश) यांना नाही
  • ध्यान फाउंडेशन’ या संस्थेने यूट्यूबवरील पाच बदनामीकारक व्हिडिओ हटवण्यासाठी मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती
  • कलम ६९-ए अंतर्गत माहिती ब्लॉक करण्याचे अधिकार केवळ केंद्र सरकारला आहेत आणि त्यासाठी २००९ च्या विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते.
New Delhi : सोशल मीडिया किंवा इंटरनेटवरील एखादी पोस्ट/व्हिडीओ (कंटेंट) काढून टाकण्याचे आदेश देण्याचा अधिकार ‘मॅजिस्ट्रेट’ (कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश) यांना नाही, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९-ए अंतर्गत ऑनलाईन मजकूर हटवण्याचे किंवा ब्लॉक करण्याचे आदेश देण्याचे अधिकार दंडाधिकाऱ्यांना नाहीत, या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्राथमिक निरीक्षणाविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

‘लाईव्ह लॉ’च्या रिपोर्टनुसार, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘ध्यान फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील बैलार्ड पिअर येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ‘यूट्यूब’वर संस्थेची बदनामी करणारे पाच व्हिडीओ प्रसारित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर सुनावणी करताना, ३१ मार्च २०२३ रोजी दंडाधिकाऱ्यांनी गुगलला हे व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले होते.

विशिष्ट कारणासाठीच अधिकार

उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, आयटी कायद्याचे कलम ६९-ए केंद्र सरकारला विशिष्ट कारणास्तव माहिती बलॉक करण्याचे अधिकार देते. या प्रक्रियेसाठी २००९ चे नियम लागू होतात, ज्यात दंडाधिकान्यांना स्वतंत्रपणे असे आदेश देण्याचे अधिकार दिलेले नाहीत.

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

सरन्यायधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली याच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मात्र, याचिकाकत्र्याला दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य असल्याचे न्यायालयाने रद्द केले,

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही. मात्र, हा निर्णय याचिकाकर्त्यांला कायद्यानुसार दिवाणी न्यायालयात जाण्यापासून रोखणार नाही.

गुगलने मागितली होती दाद

जिल्हाधिकाऱ्याच्या या आदेशाविरोधात गुगलने सत्र न्यायालयात दाद मागितली, सत्र न्यायालयाने दंडाधिका-यांच्या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगितीविरोधात ‘ध्यान फाउंडेशन’ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, उच्च न्यायालयात गुगलने असा युक्तिवाद केला की, आयटी कायद्याच्या कलम ६९-ए आणि २००९ च्या नियमांनुसार, केवळ केंद्र सरकार किया अधिकृत अधिका-यांकडेच मजकूर ब्लॉक करण्याचे अधिकार आहेत, दंडाधिका-यांकडे नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने गुगलचा हा युक्तिवाद प्राथमिकदृष्ट्‌या ग्राहा धरला आणि सत्र न्यायालयाच्या स्थगिती आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Web Title: Order to delete text magistrate has no authority bombay high courts decision upheld

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Bombay High Court
  • Social Media
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर
1

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा अवमानाचा मुद्दा चर्चेत
2

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा अवमानाचा मुद्दा चर्चेत

Supreme Court News: कागदपत्रे उधळली, सरन्यायाधीशांविरोधात अपशब्द…! सुप्रीम कोर्टात वकीलाचा पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा
3

Supreme Court News: कागदपत्रे उधळली, सरन्यायाधीशांविरोधात अपशब्द…! सुप्रीम कोर्टात वकीलाचा पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत
4

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.