क्रौर्याचा कळस! नवजात बाळाला सोडलं रस्त्यावर, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून...
पुणे : पुर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना बिबवेवाडीतील इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. याघटनेत रोहित राजेंद्र गाडे (वय ३४ रा. बिबवेवाडी ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत गाडे याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गणेश लावडे, प्रथमेश कचरे, श्रेयस कांबळे (सर्व रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित रविवारी (२० ऑक्टोबर) इंदिरानगर परिसरात मित्रासोबत गप्पा मारत थांबला होता. तेव्हा रोहितचा गणेश लावडे याच्याशी वाद झाला. गणेश साथीदारांसह इंदिरानगर येथे आला. त्याने रोहित याला शिवीगाळ केली.
टोळक्याच्या हातात बांबू होते. ‘आज याला जिवंत ठेवायचे नाही, याला संपवून टाका‘, अशी धमकी देऊन गणेश आणि साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. तर, रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू रोहितच्या डोक्यात मारला. नंतर टोळके पसार झाले. यात रोहित गंभीर जखमी झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक संजय निकुंभ करत आहेत.