Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी शेख अमजद फरार झाला आहे. दुसऱ्या कैद्याचे डोके फोडून झालेल्या गोंधळाचा फायदा घेत त्याने पलायन केले. पोलीस शोध घेत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 04:18 PM
जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! (Photo Credit- X)

जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार!
  • कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन
  • निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जमिनीच्या वादातून तरुणाचे अपहरण करून निघृण हत्या केल्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात बबला टोळीतील सदस्य शेख अमजद असद ऊर्फ मोहसीन (४५, रा. जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याने रविवारी दुपारी हर्सल येथील खुल्या कारागृहातून पलायन केले. प्रकरणात हसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शेख अमजद याच्या शोधासाठी हर्सल पोलिस ठाण्याचे डीबीचे एक पथक आणि गुन्हे शाखेचे एक पथक असे दोन पथक शोध घेत आहेत. आरोपी हा बीडला असण्याची शक्यता सुऱ्यांनी वर्तविली होती, त्यानुसार एक पथक बीडला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शेख अमजद रविवारी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास कारागृहाच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी न दिसल्याने कारागृह अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, तो कुठेही आढळून न आल्याने अखेर त्याच्या पलायनाची खात्री झाली.

प्रकरणात हसुल येथील मध्यवर्ती कारागृहाचे साजिद खान नन्हेखान (४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अमजद हा २०१८ साली घडलेल्या एका खून प्रकरणातील दोषी असून, त्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो सुरुवातीला अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. जुलै २०२४ मध्ये त्याची बदली हसूल कारागृहात करण्यात आली. कारागृहातील वर्तन समाधानकारक असल्याच्या अहवालानंतर त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले.

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेला कैदी खुल्या कारागृहातून फरार होणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. कैद्याच्या हालचालींवर योग्य देखरेख होती का, सुरक्षा यंत्रणा पुरेशी सक्षम होती का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणामुळे खुल्या कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा संशयाची छाया पसरली असून, वरिष्ठ स्तरावर चौकशी होण्याची शक्यता आहे.

वादानंतर संधी साधून पलायन

८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२० वाजता झाडू कामाकरिता कैदी अमजद शेख याच्यासह ११ बंदी कारागृहाच्या कवायत मैदानावर कामासाठी गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व बंदी कामावरून परतल्यानंतर अंघोळीसाठीहौदाकडे गेले. हौदावर आंघोळ करत असताना शेख अमजद आणि कैदी राजू विश्वनाथ याच्याशी आरोपी शेख अमजदचा वाद झाला होता. शेख अमजद याने राजू जाधव याच्या डोक्यात दगड मारुन त्याचे डोके फोडले. राजू जाधव रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याने त्यास कारागृहातील दवाखान्यात नेण्यात आले. या गोंधळाचा फायदा घेत त्याने पलायन केले.

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

Web Title: Harsul open jail prisoner sheikh amjad escapes chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Police Bharti 2026: पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी
1

Police Bharti 2026: पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय टाळा! मैदानी चाचणीच्या काळात जादा बस फेऱ्या सोडण्याची मागणी

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…
3

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड
4

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.