Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ

भरवर्दळीत अन् मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दांडेकर पुल ते पानमळापर्यंत दुचाकीवरील ६ समाज कंटकांनी एका कारमधून निघालेल्या व्यावसायीकाचा पाठलाग करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 07, 2024 | 05:50 PM
व्यावसायिकाची कार डवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ

व्यावसायिकाची कार डवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातचं आता भरवर्दळीत अन् मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दांडेकर पुल ते पानमळापर्यंत दुचाकीवरील ६ समाज कंटकांनी एका कारमधून निघालेल्या व्यावसायीकाचा पाठलाग करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने प्रकार ओळखत कार लॉक केल्यानंतर मात्र, समाजकंटकांनी शस्त्रे काढून हौदोस घालत दगडाने कारच्या काचा फोडत दहशत माजविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फर्निचर व्यावसायीक संतोष पुनमाराम सुथार (रा. वारजे माळवाडी) यांनी दुचाकीवर आलेल्या आठ जणांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुथार यांच्या तक्रारीनुसार नेहमीप्रमाणे तक्रारदार दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठच्या सुमारास निघाले होते. दांडेकर पुलावरून जात असताना तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी हॉर्न वाजविल्यानंतर टोळक्याने कारचा पाठलाग केला. पानमळा येथे कार आल्यानंतर ती आडवली. तसेच, हुज्जत घालत पैशाची मागणी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. काही वेगळा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच सुथार यांनी गाडी लॉक करत काच वरती केले. तेव्हा एकाने गाडीवर दगड फेकून मारला तर दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार दाखवले. त्याचवेळी तक्रारदार फोन काढून व्हिडीओ बनवत असताना आरोपींनी समोरील काचेवर दगड फिरकावला. हा सर्व प्रकार घडताना व कारवर दगड फेकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत हॉर्न वाजविण्याच्या कारणातून झालेला हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र  निष्पन्न आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : बोपदेव घाट प्रकरणानंतर पोलिसांना आली जाग; दिवस-रात्र पेट्रोलिंग आणि करणार ‘या’ सुरक्षायोजना

चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ

दिवाळी संपली अन् शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला असून, लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी धनकवडी, खराडी, हडपसर भागात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार या त्यांच्या सूनेसोबत सोमवारी दुपारी बालाजीनगर परिसरातून पायी चालत जात होत्या. तेव्हा काशीनाथ पाटील नगर येथे पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

Web Title: An attempt has been made to rob a businessmans car in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!
1

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.