संग्रहित फोटो
मृत महिलेचा भाऊ सय्यद साजिद अली (अचलपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती आपल्या पत्नीचा सतत छळ करत होता. मृत महिलेच्या नावावर असलेला भूखंड विकून तो स्वतःच्या नावावर हस्तांतरित करत असे. याशिवाय तो तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे आणि तिने घर सोडल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सोमवारी घर बंद असल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबीयांनी घरात जाऊन पाहिले असता नसरीन बानो पलंगावर मृत अवस्थेत आढळली.
पोलिसांची धडक कारवाई
घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या भाच्याने व भावाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने हलवली. पोलिस आयुक्त राकेश ओला व उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपाली राऊत आणि त्यांच्या डीबी पथकाने अवघ्या आठ तासांच्या आत आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय राऊत करत आहेत.
हे सुद्धा वाचा : छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक
१६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला
मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित अल्पवयीन मुलाने काही महिन्यांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि सुधारगृहातून बाहेर आलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत फोटो काढला होता. त्यानंतर त्याने ‘King Is Back’ असे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. या स्टेटसमुळे पूर्वीच्या हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच रागातून संबंधित मुलावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.






