Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

धनकवडी परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत ३ वेगवेगळ्या सोसायट्यांमधील फ्लॅट फोडत ऐवजावर डल्ला मारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 24, 2026 | 12:30 AM
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धनकवडी परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत ३ वेगवेगळ्या सोसायट्यांमधील फ्लॅट फोडत ऐवजावर डल्ला मारला आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सहकारनगर पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अशोक लिंगाजी पवार (वय ४५, रा. प्रेमानंद सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पवार हे एका मेडिकल दुकानात काम करतात. (दि. २० जून) दुपारी त्यांच्या भाऊ शिवाजी पवार यांनी फोन करून घराचे कुलूप तोडून कोणी तरी आत प्रवेश केल्याची माहिती दिली. नंतर पवार यांनी घरी जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट उचकटून सुमारे २० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. घटनेनंतर पवार यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तीन संशयित चोरटे घरात प्रवेश करताना दिसून आले.

हे सुद्धा वाचा : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

तपासादरम्यान याच चोरट्यांनी शंकर महाराज मठासमोरील रॉयल ऑर्केड इमारतीच्या ई-विंगमधील तसेच साई निवास इमारतीतील सदनिकांमध्येही घरफोडी केल्याचे समोर आले आहे. भरदिवसा घडलेल्या या सलग घरफोड्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली!

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांकडून १५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोंढवा पोलिसांनी अवघ्या १७ तासांत मुलीचा शोध घेत तिला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेतले. परंतु, या सायबर चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिसांनी तांत्रिक तपासावरून त्या दोघांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी बनावट अपहरणाचा व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू आहे.

Web Title: An incident of theft by burglars has occurred in dhankawadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
1

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
3

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
4

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.