Anti-Narcotics Cell: अंमली पदार्था विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक, सौजन्य : एक्स
अंमली पदार्थ विरोधी कक्षा (Anti-Narcotics Cell)ने मुंबईच्या उपनगरातील कांदिवलीत एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कक्षाने आपल्या अंमली पदार्थ मोहिमेचा वेग वाढवला असून गुप्त माहितीच्या आधारे अनेक ठिकाणी झापेमारी केली आहे. दरम्यान, ही नव्याने केलेली कारवाई गस्तीदरम्यान करण्यात आली. मागील काही दिवसांतील ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे (कांदिवली युनिट) पथक बोरीवली (पूर्व) परिसरातील खोडियार नगर भागात गस्त घालत होते. यावेळी एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना आढळली. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या सॅकबॅगमधून 691 ग्रॅम वजनाचे उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
🔸Anti-Narcotics Cell’s major crackdown in Kandivali; one arrested with heroin worth ₹1.38 crore! The Anti-Narcotics Cell’s Kandivali Unit carried out a major operation against the illegal sale of narcotics in the Mumbai suburbs. A suspect was detained & further investigation… pic.twitter.com/tFiS60w2LF — मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) September 30, 2026
त्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडे आढळलेले 691 ग्रॅमच्या हेरॉइनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात चक्क 1,38,20,000 रुपये (1 कोटी, 38 लाख 20 हजार रुपये) एवढी आहे. मुंबईत झालेल्या या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाच्या (६९१ ग्रॅम हेरॉईन) गंभीरतेनुसार, आरोपीविरुद्ध NDPS कायदा, 1985 (अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा) मधील अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त (ANC) पूर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे आणि उपनिरीक्षक निखिल शेळके यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. आरोपी हा माल मुंबईत कोणाला पुरवणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण






