Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरू देवनूर यांना अटकपूर्व जामीन

पवित्र नाम देवालय चर्चेमध्ये ६ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान चर्चच्या १४१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजकांनी आधीच खडक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 12:12 PM
धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : कीर्तनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ब्रिटीश धर्मगुरू पंकज जेम्स देवनूर यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि हमी रकमेवर पुणे सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली.

‘यातील तक्रारदाराने कार्यक्रम हिंदू धर्माचा आहे आणि बॅनरवरील चर्चचे चित्र हे मंदिराचे आहे अशा गैरसमजातून कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कीर्तन, पोवाडा, अभंग, भारुड, टाळ, वीणा, मृदंग या गोष्टी केवळ एकाच धर्मापुरत्या मर्यादित आहेत या गैरसमजातून ही ‘एफआयआर’ दाखल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमात सर्वांना खुला प्रवेश होता, याचा अर्थ इतर धर्मातील लोकांना धर्मांतरित करण्यासाठी बोलावले होते असा होत नाही,’ असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला. ‘

या प्रकरणात इंग्लंडमधील अँग्लिकन एपिस्कोपल चर्च आणि मँचेस्टर येथील मराठी चर्चचे बिशप पंकज जेम देवनूर (मूळ रा. सिद्धनाथवाडी, वाई, सातारा) यांच्याविरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा आणि इमिग्रेशन व परदेशी नागरिक कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत, अमित राजू भोसले यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पावणेआठ ते सव्वाआठ या वेळेत पंच हौद चौकातील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये घडली. त्यानंतर फादर देवनूर यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे आणि अॅड. रुपाली ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली.

वर्धापन दिनानिमित्त चर्चमध्ये कार्यक्रम

पवित्र नाम देवालय चर्चेमध्ये ६ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान चर्चच्या १४१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजकांनी आधीच खडक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती. निमंत्रण पत्रिकेत कुठेही इतर धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा हेतू असल्याचा उल्लेख नव्हता, असा युक्तिवाद अॅड. ठोंबरे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला.

अटींसह जामीन मंजूर

फादर देवनूर यांनी दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत खडक पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ नये, कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

Web Title: Anticipatory bail for british clergyman in religious conversion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
1

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
4

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.