Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट नऊ गावांच्या प्रारुप विकास आराखड्यात माेठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. रस्त्यांची रुंदी, रस्त्यांचे संरेखन, सार्वजनिक वापराच्या जागा, नागरी सुविधा आदीसंदर्भातील सुमारे १४३ आरक्षणे बदलली गेली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 03:58 PM
पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्...

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्...

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील नऊ गावांच्या विकास आराखड्यात १४३ बदल प्रस्तावित
  • रस्त्यांची रुंदी आणि सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणांत फेरबदल
  • सुधारित आराखडा PMC संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट नऊ गावांच्या प्रारुप विकास आराखड्यात माेठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. रस्त्यांची रुंदी, रस्त्यांचे संरेखन, सार्वजनिक वापराच्या जागा, नागरी सुविधा आदीसंदर्भातील सुमारे १४३ आरक्षणे बदलली गेली आहेत. महापालिकेच्या हद्दीत २०१७ साली अकरा गावे  समाविष्ट झाली हाेती. यापैकी दाेन गावे वगळून तेथे नगर परीषद स्थापन केली गेली. त्यामुळे नऊ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार केला गेला. या आरखड्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना  मागविल्या गेल्या हाेत्या. त्यानंंतर १४३ फेरबदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

 

रस्त्यांची रुंदी आणि संरेखन, सार्वजनिक सुविधांची जागा तसेच आरक्षणांचे प्रयोजन यांत हे बदल आहेत. सुधारित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिले आहेत. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रस्तावित बदल अंतिम होतील.

या गावांचा झाला आराखडा!

महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दाेन गावे वगळली गेली आहेत. त्यामुळे  लोहगाव, मुंढवा-केशवनगर, हडपसर (साडेसतरानळी), उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, शिवणे आणि उत्तमनगर या नऊ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. या गावांचा प्रारूप आराखडा ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध केला गेला. त्यावर हरकती आणि सुचनाही मागविल्या गेल्या हाेत्या.

काय आहेत प्रमुख बदल ? 

उंड्रीतील राज्य महामार्गाची प्रस्तावित रुंदी ६० वरून ४५ मीटर करणे

धनोरी-वाघोली रस्त्याची प्रस्तावित रुंदी ३६ वरून २४ मीटर करणे

मुंढवा-केशवनगरमधील काही ३६ मीटरचे रस्ते २४ मीटरचे करण्याचे प्रस्ताव

हडपसर-साडेसतरानळी परिसरात काही २४ मीटरचे रस्ते १८ मीटरचे, तर काही १८ मीटरचे रस्ते १२ मीटरचे करणे

लोहगावमध्ये खेळाचे मैदान, शाळा, महापालिका कार्यालय, पाण्याची टाकी आणि इतर सुविधांच्या आरक्षणांमध्ये बदल सुचविले आहेत.

धायरीत बस डेपोच्या आरक्षणाचा काही भाग ट्रक टर्मिनलसाठी दर्शविला

आंबेगाव बुद्रुकमध्ये खेळाचे मैदान, सांस्कृतिक सभागृह आणि उद्यानांच्या आरक्षणांत बदल सुचविले आहेत.

शिवणे परिसरातील दवाखाना, उद्यान आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणांतही फेरबदल आहेत.

हे सुद्धा वाचा : एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

माहिती संकेतस्थळावर

प्रस्तावित फेरबदलांची सूची आणि नकाशे पुणे महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुढील ३० कामकाजाच्या दिवसांत नगररचना विभागाच्या पुणे शाखेतील नवीन प्रशासकीय इमारतीत तसेच महापालिका आयुक्त कार्यालयात नागरिकांना आराखड्याचे अवलोकन करता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नऊ गावांच्या विकास आराखड्यात किती बदल प्रस्तावित केले आहेत?

    Ans: नऊ गावांच्या प्रारूप विकास आराखड्यात रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि आरक्षणांसह सुमारे १४३ फेरबदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

  • Que: विकास आराखड्यात कोणत्या गावांचा समावेश आहे?

    Ans: लोहगाव, मुंढवा-केशवनगर, हडपसर-साडेसतरानळी, उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, शिवणे आणि उत्तमनगर या नऊ गावांचा समावेश आहे.

  • Que: नागरिकांना सुधारित विकास आराखडा कुठे पाहता येणार आहे?

    Ans: प्रस्तावित फेरबदलांची यादी आणि नकाशे पुणे महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच पुढील ३० कामकाजाच्या दिवसांत संबंधित कार्यालयांमध्ये आराखड्याचे अवलोकन करता येणार आहे.

Web Title: Changes have been made to the development plan for the nine villages under the pune municipal corporation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती
1

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!
2

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
3

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
4

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.