Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा

PMC Bomb Threat Email:ई-मेलच्या शेवटी 'खलिस्तान नॅशनल आर्मी' असे नाव लिहिले असून, इंजिनिअर गुरानाख सिंह रुकन शाहवाला आणि डॉ. गुरनिर्वैर सिंह खान राजादा यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2026 | 06:40 PM
Pune News, Bomb Threat, Amitabh Bachchan, Mumbai Airport, Diljit Dosanjh

Pune News, Bomb Threat, Amitabh Bachchan, Mumbai Airport, Diljit Dosanjh

Follow Us
Follow Us:
  • पुणे मनपा इमारत व महापौर कार्यालयाला धमकी
  • अमिताभ बच्चन व ‘जलसा’ बंगल्याला लक्ष्य
  • विमानतळ व दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचा उल्लेख
 

PMC Bomb Threat Email: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी (दि. १२) दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये पुणे महानगरपालिकेची मुख्य इमारत आणि महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानालाही लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन आणि ‘जलसा’ बंगल्याला लक्ष्य करण्याची धमकी

या धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबईतील अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान असलेल्या ‘जलसा’ बंगल्यावर रात्री ९ वाजून ११ मिनिटे ते पहाटे ५ वाजून ११ मिनिटांच्या दरम्यान कार बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर, १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत त्याचा बदला घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अमिताभ बच्चन यांची हत्या करण्याची धमकीही या संदेशात दिली आहे.

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

विमानतळ आणि दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमालाही इशारा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. तसेच, येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टमध्ये आयफोनच्या (iPhone) माध्यमातून स्फोट घडवण्याची धमकी देत नागरिकांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहनही यात केले आहे. याशिवाय मुंबईतील न्यायालये आणि बँकांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

‘खलिस्तान नॅशनल आर्मी’चा उल्लेख

ई-मेलच्या शेवटी ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ असे नाव लिहिले असून, इंजिनिअर गुरानाख सिंह रुकन शाहवाला आणि डॉ. गुरनिर्वैर सिंह खान राजादा यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

सध्या या ई-मेलमधील दाव्यांची सत्यता आणि हा ई-मेल कोणी व कोठून पाठवला, याचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया आणि सुरक्षा तपासणीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

कोणाला मिळाली धमकी?

मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पुन्हा एकदा मिळाला असून शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेला आठवडा उलटण्याआधीच गुरुवारी (१२ नोव्हेंबर) पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबई महापौर कार्यालय, शहरातील बँक, न्यायालय, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे महानगरपालिकेला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये कोणकोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे?

    Ans: या ई-मेलमध्ये पुणे मनपाची मुख्य इमारत व महापौर कार्यालय, अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील 'जलसा' निवासस्थान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, २७ नोव्हेंबरचा दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट तसेच मुंबईतील न्यायालये व बँकांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • Que: अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात ई-मेलमध्ये नेमकी काय धमकी देण्यात आली आहे?

    Ans: 'जलसा' बंगल्यावर रात्री ९:११ ते पहाटे ५:११ दरम्यान कार बॉम्बने हल्ला करण्याची आणि १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत ३१ डिसेंबरपर्यंत अमिताभ बच्चन यांची हत्या करण्याची धमकी या ई-मेलमध्ये दिली आहे.

  • Que: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टबाबत ई-मेलमध्ये काय म्हटले आहे?

    Ans: येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमात आयफोनच्या (iPhone) माध्यमातून स्फोट घडवून आणण्याची धमकी देत नागरिकांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे म्हटले आहे.

Web Title: Pune municipal corporation receives bomb threat email targeting as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bomb threat
  • Diljit Dosanjh
  • mumbai airport
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर
1

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती
2

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…
3

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री
4

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.