Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांचा प्राथमिक प्रस्ताव समोर आणला आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 11:45 AM
पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांसाठी मोठी बातमी! 
  • ३१ किमीचे दोन भुयारी मार्ग
  • वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन
पुणे : पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांचा प्राथमिक प्रस्ताव समोर आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘पाताळ लोक’ प्रकल्पांतर्गत शहरात तब्बल ३१ किलोमीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 

या प्रस्तावानुसार पहिला भुयारी मार्ग भोसरी ते उंड्रीदरम्यान उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे २३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग भोसरी, संगमवाडी, धोबीघाट, पुणे कॅन्टोन्मेंट, कोंढवा आणि उंड्री या भागांना जोडू शकतो. त्यामुळे शहराच्या उत्तर भागातून दक्षिण भागात जाणाऱ्या वाहनचालकांना शहरातील गर्दीच्या रस्त्यांना पर्याय मिळू शकतो. भविष्यात पुरंदर विमानतळाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरा भुयारी मार्ग भूगाव ते एरंडवणे असा प्रस्तावित आहे. सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या या मार्गात राम नदी, डुक्कर खिंड आणि डी. पी. रोड यांना जोडण्याचे नियोजन आहे. पश्चिम पुण्यातील वाढती वाहनांची गर्दी आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो.

सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया

या दोन्ही भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. प्रस्तावित मार्गांची निश्चिती करताना गुगल ट्रॅफिकवरील माहिती, वाहतूक पोलिसांकडील आकडेवारी, नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धती आणि शहरातील वाहतुकीशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जाणार आहे.

मेट्रो, रिंग रोडशी जोडण्याचे नियोजन

या भुयारी मार्गांचे नियोजन करताना शहरातील इतर महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांचाही विचार केला जात आहे. प्रस्तावित मार्ग मेट्रो, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आणि उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) यांच्याशी जोडण्याची शक्यता तपासली जाणार आहे. त्यामुळे शहरातील विविध वाहतूक व्यवस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.

हे सुद्धा वाचा : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

प्रत्यक्ष कामासाठी अनेक टप्प्यांची परीक्षा

दरम्यान, दोन्ही भुयारी मार्गांचा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर तांत्रिक व्यवहार्यता, प्रकल्पाचा खर्च, आर्थिक उपलब्धता आणि पर्यावरणविषयक बाबींची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय विविध शासकीय विभागांच्या परवानग्याही आवश्यक असतील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एकूणच, ३१ किलोमीटरच्या या दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडू शकतो. मात्र, प्रकल्पाची अंतिम दिशा सविस्तर अभ्यास आणि मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात किती भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत?

    Ans: पुणे शहरात ‘पाताळ लोक’ प्रकल्पांतर्गत एकूण ३१ किलोमीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत.

  • Que: हे दोन्ही भुयारी मार्ग कोणत्या भागांना जोडणार आहेत?

    Ans: पहिला मार्ग भोसरी ते उंड्री (२३ किमी), तर दुसरा मार्ग भूगाव ते एरंडवणे (८ किमी) असा प्रस्तावित आहे.

  • Que: या भुयारी मार्गांचे काम कधी सुरू होणार?

    Ans: सध्या प्रकल्प प्राथमिक टप्प्यात आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणविषयक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Web Title: The municipal corporation has devised a major plan to reduce traffic congestion in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा
1

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती
2

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…
3

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
4

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.