पार्किंगमध्ये लघुशंका केल्याने झाला वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी : पार्किंगमध्ये लघुशंका करण्यास रोखल्याने तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.24) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचवडच्या पत्रा शेड लिंकरोड येथे घडली. संदेश पावलस पवार (वय 28, पिंपळे सौदागर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दया बेलभंडारी, गोल्या पवार, अक्षय साबळे (पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दया बेलभंडारी हा पत्रा शेड येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये लघुशंका करत होता. फिर्यादी संदेश पवार यांनी त्याला रोखले असता आरोपींनी संदेश पवार यांच्यासोबत वाद घालून त्यांना बेदम मारहाण करत जखमी केले. जखमी झालेल्या संदेश पवार याने याप्रकरणाची फिर्याद चिंचवड पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : अहिल्यानगर हादरलं! क्रिकेटच्या वादातून आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्याचा चाकूने खून
दरम्यान, अक्षय, गोल्या आणि दया बेलभंडारी तिघांनी तरुणासोबत वाद घालून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संदेश पवार हा जखमी झाला. त्याने फिर्याद दिल्याने पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
अकोल्यात घडली एक विचित्र घटना
दुसऱ्या एका घटनेत, अकोल्यात एक विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला आणि वादाला तोंड फुटला. चालकाला मारहाण करण्यात आली आणि रुग्णवाहिकेत असेलल्या जखमी रुग्णाचा जीव गेला. ही घटना अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली.