
मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सात जणांच्या टोळीने खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना जीवे मारण्याची धमकी देत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मोटारसायकली लुटल्या.
या दरोड्यात अवदेवस्ती येथील नागरिकांचे सोन्याचे टॉप्स, मनी-मंगळसूत्र, सोन्याची फुले, सोन्याचे बदाम, रोख रक्कम व मोबाईल फोन लुटण्यात आले. तसेच नकाबाई शिंदे यांच्या घरातील सोन्याचे गंठन, मंछली, नथी आणि इतर दागिन्यांसह मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरट्यांनी पळविला. याशिवाय मुकिंदा चलवादी यांचा मोबाईल फोन व हिरो होंडा फॅशन प्लस मोटारसायकल, तसेच विनय कदम यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकलही चोरट्यांनी लंपास केली.
या सर्व घटनांमध्ये एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत अनेकांना मारहाण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दौंड शहरालगत घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा