Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी स्वप्न पाहणारा, इतरांना बळ देणारा व्यक्ती गेला, कलाकारांनी व्यक्त केला शोक; नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टीला हादरा

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 02, 2023 | 11:41 AM
मोठी स्वप्न पाहणारा, इतरांना बळ देणारा व्यक्ती गेला, कलाकारांनी व्यक्त केला शोक; नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टीला हादरा
Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं (Nitin Desai Sucide) हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते आर्थिक विंवचनेत होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. स्वकष्टाने उभारलेल्या कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

[read_also content=”क्रूरतेचा कळस…शारिरिक अत्याचाराचा महिलेनं केला विरोध, पिसाटलेल्या नराधमानं आधी केला खून, मग मृतदेहावर अत्याचार https://www.navarashtra.com/crime/a-man-killed-a-women-and-rape-with-her-dead-body-in-dehradun-uttarakhand-nrps-439814.html”]

अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया

अमोल कोल्हे म्हणाले, ‘हे खूप शॉकिंग आहे. खूप वर्ष आम्हीसोबत काम केलं आहे. फायटिंग स्पिरिट असणाऱ्या माणसाबाबत अशी बातमी ऐकायला मिळणं हे शॉकिंग आहे. मराठी माणसाची मान बॉलिवूडमध्ये त्यांनी उंच केली. आम्ही जवळपास सहा-सात वर्ष एकत्र काम केलं. दादांच्याबाबतीत अशी बातमी समोर येत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.’

सुबोध भावे

मोठी स्वप्न पाहणारा, ज्याच्याकडे पाहून इतरांना बळ देणारा नितीन देसाई गेला. बालगंधर्वांसारखा प्रेक्षकांना भव्य दाखवण्याचा हव्यास होता, मेहनती होता. त्याच्याविषयी आदर आणि अभिमान होता. असं सुबोध भावे यांनी म्हण्टलं आहे.

अभिजीत पानसे

नितीन देसाई यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. यावर मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, नितीन दादा  यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला आहे. पुण्यात एका फिल्म स्कूलबाबत आमचं बोलणंही सुरु होतं. अचानक ही बातमी आली आहे. तो खूप मोठा माणूस होता. त्यांनी ऐवढं मोठ पाऊल का उचललं? खूप मोठा धक्का आहे असं  ते म्हणाले.

जितेंद्र जोशी

तो खूप मोठा व्हिजनरी माणूस होता. त्यांच्या अचानक जाण्याने कधीही भरुन न निघणारी ही हानी झाली आहे. कला दिग्दर्शन काय असतं? हे त्यांच्या कामाकडे बघून कळतं. तो दमदार माणूस होता. त्यांना असं का वाटलं असेल? कशामुळे हे घडलं असेल? मला काय बोलावं समजत नाही. असं अभिनेता जितेंद्र जोशीने सांगितलं.

महेश कोठारे

नितीन देसाईच्या निधनाचे वृत्त ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे, असे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी म्हटले. नितीन देसाई माझ्यावर खूप प्रेम करायचे. आम्ही झपाटलेला-२ हा चित्रपट थ्रीडीमध्ये केला तेव्हा त्याचे प्रॉडक्शन डिझाईन नितीन देसाई यांनी केले होते. असं महेश कोठारे यांनी सांगितलं.

Web Title: Art director nitin desai dies by suicide at nd studio in karjat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 11:14 AM

Topics:  

  • entertainment
  • nitin desai

संबंधित बातम्या

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
1

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले
2

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!
3

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत
4

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.