Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…

आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. खरातविरोधात आतापर्यंत १२ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 09:23 AM
खरातचे आणखी ६ महिलांशी संबंध

खरातचे आणखी ६ महिलांशी संबंध

Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिक सेक्स स्कँडलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू तांत्रिक अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास अधिक तीव्र झाला आहे. एसआयटीच्या तपासात खरातचे आणखी सहा महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि काळी जादूच्या नावाखाली गैरप्रकार केल्याप्रकरणी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. खरातविरोधात आतापर्यंत १२ हून अधिक गुन्हे दाखल झाले असून, त्यात लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवनिका संस्थेचे माजी सचिव तथा जगदंबा माता पतसंस्थेचे संचालक नामकर्ण आवारे यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि बनावट खात्यांच्या प्रकरणात ही अटक महत्त्वाची मानली जात आहे.

तपासात उघड झाले की, सिन्नर येथील जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरात यांनी उघडलेल्या ३२ खात्यांना नामकर्ण आवारे यांची संमती होती. तसेच या प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खरातसोबत संगनमत करून लैंगिक शोषणाच्या आडून मोठे खंडणी रॅकेट चालवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या रॅकेटमधून ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही झाली सहा तास कसून चौकशी

यापूर्वी एसआयटीने रूपाली चाकणकर यांची सुमारे सहा तास कसून चौकशी केली होती. खरातसोबत कथित संबंध असल्याच्या आरोपांनंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

खरातची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

एका मोठ्या कारवाईत ईडीने नाशिक सेक्स स्कँडलमध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरात या भोंदू तांत्रिकाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तपास यंत्रणेने नाशिकमधील एका सहकारी बँकेतील अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त खात्यातील लॉकरमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. खरात दाम्पत्याच्या मुलीच्या उपस्थितीत, इंडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉडिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मौल्यवान वस्तू जप्त केल्या.

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

Web Title: Ashok kharat had relationships with six more women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
1

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
2

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.