बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटप करण्यासाठी कोल्हेमळा या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. लाभार्थींकडून भांडी व साहित्य देण्यासाठी एजंट पैसे घेतात अशा गेल्या काही दिवसापासून तक्रारी होत आहेत. यासंदर्भात संबंधित पत्रकाराने दोन दिवसांपूर्वी बातम्या केल्या होत्या.
सोमवारी ( दि. २) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगावच्या कोल्हेमळा या ठिकाणी कामगारांना साहित्याचे वाटप होणार असल्याने हे वृत्त संकलन करण्यासाठी पत्रकार गेला होता. यावेळी काही लाभार्थी महिलांनी सांगितले की आमच्याकडून जास्त पैसे घेतले जातात. हे वृत्त संकलित करीत असताना अचानकपणे या माध्यम प्रतिनिधीला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्याच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली.
दरम्यान माध्यम प्रतिनिधीने नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा लेखी अर्ज दिला असून या अर्जामध्ये म्हटले आहे की, कामगार साहित्य वाटप नोंदणी संदर्भात भ्रष्टाचार होत असल्या बाबतच्या बातम्या दोन दिवसापासून मी करीत आहे. सोमवारी नारायणगाव जवळच्या कोल्हेमळा या ठिकाणी कामगारांना भांडी व साहित्य वाटप होणार असल्याची माहिती समजल्यावर बातमी करण्यासाठी गेलो होतो. यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्या तथाकदीत एजंट यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व माझ्या चारचाकी गाडीची पुढील काच देखील फोडली आहे. या अज्ञात एजंटाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकाराने अर्जाद्वारे केली आहे.
Narayangaon News: जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना २४ तासांत बेड्या; नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई
नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई
नारायणगाव वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या असून, चोरट्यांकडून मु्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अभंग वस्ती येथे राहणाऱ्या चंद्रिका कुमार रामचंद्र महातो वय ३० वर्षे धंदा मजुरी या वारूळवाडी येथील स्मशानभूमी जवळील पुलावरून दुपारी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने तंबाखू आहे का असे विचारले? तर दुसऱ्याने फिर्यादीच्या गळ्यातील दुर्गा मातेचे चित्र असलेले सोन्याचे पदक हिसकावून घेऊन पुलाखालून नदिपात्रात पळून गेला. या आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.