Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्…

महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी, पुंडलिकनगर) असे आरोपी वकिलाचे नाव असून, त्याच्या विरोधात यापूर्वी पीडित तरुणीने आठ ते नऊ तक्रारी नोंदविल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 07, 2025 | 01:56 PM
कौटुंबिक वादातून संतप्त पतीने केला खून

कौटुंबिक वादातून संतप्त पतीने केला खून

Follow Us
Follow Us:

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. असे असताना देवदर्शनासाठी आलेल्या 26 वर्षीय तरुणीवर वकिलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) रात्री दहाच्या सुमारास गजानन मंदिर परिसरात घडली.

महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी, पुंडलिकनगर) असे आरोपी वकिलाचे नाव असून, त्याच्या विरोधात यापूर्वी पीडित तरुणीने आठ ते नऊ तक्रारी नोंदविल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. प्रकरणात २६ पीडित तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता वकिलीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. ४ डिसेंबर रोजी रात्री पीडिता गजानन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवदर्शन करून ती मंदिराबाहेरील चप्पल स्टँडजवळ उभी असताना महेंद्र नैनाव हा तेथे आला.

नैनाव याने अचानक तिचा डावा हात पकडून ओढत पुलाकडे नेले आणि एका दुकानामागे उभ्या केलेल्या चारचाकीत जबरदस्तीने ढकलले. दरवाजे बंद करून त्याने चाकू दाखवत स्वतःच्या हाताची नस कापेन किंवा तुझा जीव घेईन, अशी धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला.

‘केस मागे घे नाहीतर…’

या झटापटीत तिच्या डाव्या हाताला मार लागल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच, ‘केस मागे घे नाहीतर जीव घेईन, तुझे आणि मंत्री संजय सिरसाठ यांचा व्हिडिओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याचे देखील पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलिस ठाण्यात गुन्हा झाला दाखल

याशिवाय, नैनाव याने नातेवाईक वकील आणि सीनियर वकील यांनी ‘आम्ही तुला काही होऊ देणार नाही, तू तिचा काटा काढ’, असे म्हटल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पीडितेने आरोपीला खोटी थाप देऊन आपली सुटका करुन घेतली. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुंडलिकनगर पोलिसांकडून केला जात आहे.

हेदेखील वाचा : Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

Web Title: Attempted abused on young girl incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • Abused Case
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Bunty Dixit Murder Case :  हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती
1

Bunty Dixit Murder Case : हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
2

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
3

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

इन्स्टाग्रामवरून ओळख झाली; तरुणाने वारंवार अत्याचार केला अन् नंतर पीडिता गर्भवती राहताच…
4

इन्स्टाग्रामवरून ओळख झाली; तरुणाने वारंवार अत्याचार केला अन् नंतर पीडिता गर्भवती राहताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.