नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. चांगला पगार मिळेल या आशेने तिने जाहिरातीत असलेल्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असे सांगून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले.
त्यानंतर आरोपींनी थेट ही कार ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात एका अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. महिलेने तो केक खाल्ला आणि पीडित महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले. यानंतर रात्री ११ वाजता आरोपींनी पीडितेला रस्त्यावर सोडून दिले. तसेच याबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. महिला घाबरली होती, तिने घरी सांगितले नाही.
यानंतर तिला आरोपींनी तिला ब्लॅकमेल करू लागले. शेवटी महिलेने गुन्हा दाखल केला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. या घटनेतील आरोपी हे युट्यूब पत्रकार आहेत. त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल आहेत.
हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबरला मुंबई नाशिक हायवेजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आधी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर कोणी केली हत्या आणि का केली? याचा तपास सुरु केला. तेव्हा धक्कदायक प्रकार समोर आला.
Nashik Crime: नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास
Ans: ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात, कारमध्ये.
Ans: युट्यूब पत्रकार हिरालाल केदार (अटक) व रवी पवार (फरार).
Ans: ब्लॅकमेलनंतर 5 डिसेंबर रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.






