फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोलकातामधील डॉक्टरसोबत झालेल्या घृणास्पद घटनेनंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. त्यामुळे आता या घटनेनंतर देशामध्ये फक्त डॉक्टरच नाही सामान्य नागरिक सुद्धा संतापले आहेत. या घटनेमुळे आता देशामध्ये हाहा: कार माजवला आहे. या घटनेवर अजुनपर्यत कोणताही न्याय मिळाला नाही आणि त्याआधीच आणखी एक धक्कादायक प्रकार कोलकातामध्ये घडला आहे. X वर एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये एका मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. परंतु ती मुलगी थोडक्यात बचावली आहे आणि आजूबाजूच्या सामान्य नागरिकांनी त्या तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे.
व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, या मुलांनी दमदमच्या दुर्गानगरमध्ये एका मुलीवर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी जवळच्या क्लबमध्ये पळून गेली आणि त्या क्लबच्या हिंदू बंगाली लोकांनी मुलीला वाचवले आणि तिच्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. या व्हिडीओमध्ये तीनही गुन्हेगारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर तेथील नागरिक त्यांच्याशी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. व्हिडीओ काढताना सुद्धा एक गुन्हेगार तेथील नागरिकांशी बोलताना दिसत होता त्याने त्याच्या कानशिलात दिली. त्याचबरोबर एक गुन्हेगार एका व्यक्तीचा मोबाईल चोरी करत होता त्यावेळी सुद्धा त्याला बेदम मारहाण केली.
#BreakingNews 🚨 #Kolkata Another Rape attempt.🤬
Allegedly these boys tried to rape a girl in Durganagar of Dumdum. The girl ran away to a nearby club & the Hindu Bengalis of that club saved the girl and severely beat up those who were trying to rape her. pic.twitter.com/yQpt85pGHL— Bhairav 🔱🕉️ 🇮🇳 (@BhairavVaam) August 17, 2024
दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक धक्कादायक प्रकार मागील काही वर्षांमध्ये घडले आहे. जोपर्यत गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि कडक शिक्षा दिली जात नाही तोपर्यत अशा प्रकारच्या घटना बंद होणार नाहीत.