Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या मंजूर असलेल्या या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 02, 2026 | 12:58 PM
Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
Follow Us
Close
Follow Us:
  • पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार
  • उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
कोल्हापूर/ विजयकुमार कांबळे :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागा मार्फत पोरेवाडी (ता. चंदगड) येथील घटप्रभा नदीवरुन गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या मंजूर असलेल्या या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे गेली तेरा वर्षे ही योजना रखडत पडली आहे. ही नळपाणी पुरवठा योजना उद्घाटनाच्या आधीच कोलमडली आहे. त्यामुळे अर्ध्या कोटीचा निधी घटप्रभा नदीच्या पात्रातून वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि चंदगड पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावाला पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्यांचे नाव काळ्या यादीत घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पंचायत समितीचे तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कोणती कारवाई करणार? ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार काय.? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 12 ते 13 वर्षे रेंगाळत पडलेल्या या योजनेच्या कामाची दखल संबंधित चंदगड पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

निकृष्ट कामामुळे योजना कोलमडली

सन2012 ते 2013 साली पोरेवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला. गावच्या परिसरात पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने या योजनेसाठी आमरोळी गावच्या बोकूडशेत नावाच्या शेतात घटप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल बांधण्यात आले. ठेकेदार धोंडीबा पाटील (जट्टेवाडी) यांनी या योजनेचा ठेका घेतला. मात्र योजनेच्या कामासाठी दर्जेदार साहित्य वापरले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. हि योजना आता उ‌द्घाटनाच्या आधीच कोलमडली असून गावातील पाण्याच्या टाकीत पाणी पडण्या आधीच अर्ध्या कोटीची
रक्कम घटाभा नदीच्या पायात वाहन गेली आहे.

8 गेल्या दोन अडीच वर्षांपासून संबंधित चंदगड पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे या योजनेच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. या योजनेचे काम अपूर्ण आहे. अंदाज – पत्रकह्यमाणे केले नाही. ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. तरी संबंधीत ठेकेदाराना सुचना देवून काम पूर्ण करावे. आणि ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर – रावी अशी गावची मागणी आहे.
– प्रकाश वाईगडे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमरोळी-पोरेवाडी.

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

एक योजना पूर्ण होण्याआधीच गावासाठी दुसरी योजना मंजूर

एक योजना पूर्ण होण्याआधीच पोरेवाडी गावासाठी सन 2020 , 2021 या वर्षात 23 लाखाची जलजीवन योजना मंजूर केली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच संबंधीत चंदगड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यानी प्रत्यक्ष पहाणी केलीच नाही त्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. लाखो रुपयांच्या योजना मंजूर केल्या आहेत. त्या योजनेकडे संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत असून त्या लवकरच भुईसपाट होत आहेत. ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे साऱ्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. मे 2026 रोजी महालक्ष्मी देवीची यात्रा आहे. त्यामुळे या रखडत पडलेल्या योजनेचे काम पूर्ण करावे आणि गावाला पिण्याच्या पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोरेवाडी गावासाठी कोणती पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती?

    Ans: सन 2012–2013 मध्ये पोरेवाडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे 50 लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती.

  • Que: या योजनेसाठी पाण्याचा स्रोत कोणता होता?

    Ans: गावाजवळ पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने आमरोळी गावच्या बोकूडशेत परिसरात घटप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल बांधण्यात आला.

  • Que: योजना पूर्ण का होऊ शकली नाही?

    Ans: ठेकेदाराने दर्जेदार साहित्य न वापरल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले. तसेच पाणीपुरवठा विभाग व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजना 12–13 वर्षे रखडली.

Web Title: Kolhapur news corruption in water supply scheme villagers angry over water tank even before inauguration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur

संबंधित बातम्या

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
1

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
2

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
3

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

अचानक स्फोट झाला अन् Himachal हादरलं! आर्मी हॉस्पिटल, बिल्डिंगच्या काचा अन् 400…
4

अचानक स्फोट झाला अन् Himachal हादरलं! आर्मी हॉस्पिटल, बिल्डिंगच्या काचा अन् 400…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.