Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेला ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली की, पडेगाव परिसरातील एका घरात विविध कंपन्यांच्या गुटखा व सुगंधित तंबाखूचे पॅकिंग केले जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 02, 2026 | 02:54 PM
बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! (Photo Credit- X)

बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त!
  • ३१ डिसेंबरला पोलिसांची मोठी कारवाई
  • ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Chhatrapati Sambhaji Nagar Police Raid: संभाजीनगरमध्ये बनावट गुटखा व सुगंधित तंबाखूचे पॅकिंग करून त्याची अवैध विक्री करणाऱ्या एका घरगुती कारखान्यावर अन्न सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून पॅकिंग मशीनसह सुमारे ३ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित घर सील करण्यात आले असून ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी पडेगाव परिसरातील गट क्रमांक ८२ येथे करण्यात आली.

कारवाई आणि जप्त मुद्देमाल

या प्रकरणी शेख इर्शाद शेख शहेजाद (३५, रा. राहतनगर, जटवाडा रोड, हसुल) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार तय्यब मुंबईवाला (रा. मुंब्रा, नवी मुंबई) याचा शोध सुरू असून दोघांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, हवालदार सुनील जाधव, सुनील पाटील, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव आदींनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा: सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

घरावर टाकला छापा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेला ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली की, पडेगाव परिसरातील एका घरात विविध कंपन्यांच्या गुटखा व सुगंधित तंबाखूचे पॅकिंग केले जात आहे. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे आणि त्यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान पोलिसांनी शेख इर्शाद याला ताब्यात घेतले.

तय्यब मुख्य आरोपी

या गुन्ह्यात तय्यब मुंबईवाला हा मुख्य आरोपी असून त्यानेच घरात कारखाना उभारून बनावट गुटखा व पानमसाला तयार करण्यासाठी शेख इर्शादला प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी तय्यबने आर्थिक मदत दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याशिवाय तय्यबने आणखी एक-दोन जणांना अशाच पद्धतीने घरगुती कारखाने चालविण्यास तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांनी वर्तविली आहे.

हे देखील वाचा: Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Web Title: A makeshift factory producing counterfeit gutkha was dismantled goods worth 377 lakh were seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • crime news
  • Gutkha seized

संबंधित बातम्या

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
1

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
2

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
3

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

Chhatrapati Sambhajinagar Crime: कुठे चालली तरुण पिढी ? एकतर्फी प्रेम, नंतर छळ…, त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: कुठे चालली तरुण पिढी ? एकतर्फी प्रेम, नंतर छळ…, त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.