Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा,’ बदलापूर घटनेवरून उच्च न्यायालयाचे आदेश

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. याचदरम्यान आता या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढवले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2024 | 07:24 PM
'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा,' बदलापूर घटनेवरून उच्च न्यायालयाचे आदेश

'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा,' बदलापूर घटनेवरून उच्च न्यायालयाचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:
पश्चिम बंगाल मधील कोलकाता प्रकरण तर राज्यातील बदलापूरच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर पश्चिम बंगाल सरकारने आज (3 सप्टेंबर) विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर केले आहे. दुसरीकडे बदलापूरमध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. बदलापूर प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानेच ही घटना गांभीर्याने न घेणाऱ्या बेदरकारपणे वागणाऱ्या बदलापूर पोलिस अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.
उच्च न्यायालयात बदलापूर पोलिसांचा निष्काळजीपणा केस डायरीतून उघड झालं.  केवळ याच प्रकरणात नाही तर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज असल्याचं सांगत हायकोर्टाने बदलापूर पोलिसांना फैलावर घेतल्याचं आजच्या सुनावणीत दिसून आलं. बदलापूर प्रकरणात घाईघाईने आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका. या घटनेची सखोल चौकशी करा, आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, एवढीच माहिती न्यायालयाने दिली आहे. शिवाय फरार आरोपींच्या तपासात अजूनही यश येत नाही ही खेदाची बाब असून तपासाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेही उच्च न्यायालयात नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत आरोपींना अटक न केल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेचा विचार केला आहे.

समिती स्थापन करा, मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करा

‘बेटा पढाओ, बेटी बचाओ’,   अशी परिस्थिती आता निर्माण झालीय, असे म्हणत बदलापूर घटनेवरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या एकूण सुरक्षेबाबत राज्यस्तरीय समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. तसेच, निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव किंवा डॉ. शालिनी फणसळकर-जोशी यांच्यासह निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्या नामनिर्देशनावर विचार करण्याचे प्रशासनाला न्यायालयाकडून कळविण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

105 जणांना जामीन

बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रेल रोको आणि पोलिसांवर दगड फेक करणाऱ्या 58 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर शाळेची तोडफोड करणाच्या आरोपात असलेले 47 जणांना कल्याण सत्र न्यायाल्याने जमीन अर्ज मंजूर केला. या आंदोलकांची जामिनावर सुटका झाली आहे. तर या प्रकरणी आंदोलनकर्त्यांची केस वकील संघटनांनी मोफत लढवली. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

Web Title: Badlapur school case high court gave the order to submit the report on student safety on badlapur incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 07:24 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Badlapur school case
  • crime news

संबंधित बातम्या

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
1

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
2

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…
3

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?
4

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.