Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरगावात कार-ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू

पवन काळे व त्यांचे मेहुणे बाळासाहेब नागवडे हे वंदना काळे व आराध्या काळे यांसह त्यांच्या जवळील कारमधून शिक्षणासाठी कोल्हापूर येथे असलेल्या मुलाला भेटण्यासाठी गेलेले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 01:20 PM
नागरगावात कार-ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू

नागरगावात कार-ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : नागरगाव (ता.शिरुर) येथील न्हावरे रस्त्यालगत नलगे वस्ती येथे कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पवन राजहंस काळे, आराध्या पवन काळे व बाळासाहेब प्रकाश नागवडे असे तिघा मृतांची नावे आहेत.

निमोणे (ता.शिरुर) येथील पवन काळे व त्यांचे मेहुणे बाळासाहेब नागवडे हे वंदना काळे व आराध्या काळे यांसह त्यांच्या जवळील कारमधून शिक्षणासाठी कोल्हापूर येथे असलेल्या मुलाला भेटण्यासाठी गेलेले होते. रात्री उशिरा पुन्हा घरी परतत असताना नागरगाव हद्दीतील नलगे वस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास समोरून आलेल्या ट्रक व काळे यांच्या कारची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला.

दरम्यान, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान होऊन कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या अपघातात पवन राजहंस काळे (वय ३८ वर्षे), आराध्या पवन काळे (वय ९ वर्षे दोघे रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) व पवन काळे यांचे मेहुणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (वय ३८ वर्षे सध्या रा. बाबुराव नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गुणवडी ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर वंदना पवन काळे (वय ३० वर्षे रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

हेदेखील वाचा : Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

सदर दुर्दैवी घटनेमुळे निमोणे गावात शोककळा पसरली असून, काळे कुटुंब हे गावातील सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय तसेच परिसरात सर्वपरिचित कुटुंब म्हणून ओळखले जाते तर अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, गावात शोककळा पसरली आहे. तर घडलेल्या प्रकाराबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर शहराजवळ भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, सिन्नर-निफाड राज्यमार्गावरील सिन्नर शहराजवळील उकाडे मळ्याजवळ रस्त्याच्या मध्यवर्ती भागातील खड्डा जीवघेणा ठरत आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला हा रस्ता प्रवाशांसाठी काळ बनू आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीविताशी खेळणारे ठरत आहे. सिन्नर-निफाड हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. कानडी माळ्याच्या पुढे उकाडे मळ्याजवळ गारे इंटरप्राईजेसच्या समोर रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित केला जात आहे.

Web Title: Terrible car truck accident in nagargaon two people die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.