Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेवर दोन जणांनी धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 03:01 PM
शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्...

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्...

Follow Us
Follow Us:
  • शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला
  • शिरुर तालुक्यातील धक्कादायक घटना
  • अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेवर दोन जणांनी धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्णिमा अनिल भुजबळ (वय ४० वर्षे, रा. तांबुळ ओढा, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) या महिला शेतात एकट्या काम करत असताना कासारी–तळेगाव ढमढेरे रस्त्याने दोन जण दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून अचानक पोर्णिमा भुजबळ यांच्या दिशेने धाव घेत धारदार हत्याराने त्यांच्या तोंडावर व डोक्यावर वार केले.

या हल्ल्यात पोर्णिमा भुजबळ या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, हल्लेखोरांविषयी कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे, जखमी महिलेचे कोणतेही दागिने चोरीला गेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोर्णिमा भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

मुलाने बापाला जिवंत जाळलं

दारूचे व्यसन असलेल्या मुलाने वडिलांशी वादविवाद घातले. दोघांत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दांडेकर पुल परिसरात घडला आहे. या घटनेत वडिलांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रविंद्र भालेराव (वय ६१, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर रविंद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident has occurred in which a woman working in the field was attacked with a weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Shikrapur Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
3

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
4

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.