Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati ATM Theft: महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास

बारामती तालुक्यातील पणदरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने मशीन फोडून तब्बल 14 लाख 19 हजार 100 रुपयांची रोकड लंपास केली. घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 06:28 PM
महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास
  • सकाळी चोरीचा उलगडा
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
माळेगाव: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे गावात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये धाडसी चोरी करत तब्बल 14 लाख 19 हजार 100 रुपयांची रोकड लंपास केली. कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, एटीएम सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कटरने एटीएम मशीन फोडून रोकड लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांनी कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून त्यामधील 14.19 लाख रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळी चोरीचा उलगडा

सकाळी एटीएममध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँक प्रशासनाने तातडीने माळेगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर तपास यंत्रणांची मदत घेतली आहे. चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पणदरेतील पेट्रो कंपनीचे एक एटीएम मशीन असून, हे मशीन फोडत त्यातून चोरट्यांनी ११ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यात १०० रुपयांच्या १४१७, २०० रुपये दराच्या १५९० तर ५०० रुपये दराच्या १४६६ नोटांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी हिताची कंपनीची दुसरी मशीन असून, त्यातून २ लाख २६ हजार ४०० रुपयांची रक्कम काढण्यात आली. दोन्ही मशीनमधून एकूण १४ लाख १९ हजार १०० रुपये लंपास करण्यात आले. तसेच एटीएम मशीन व सीडीएम मशीन फोडून नुकसान केले.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

एटीएममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड असताना चोरट्यांनी सहजपणे मशीन फोडून चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

Web Title: Baramati atm theft thieves loot 14 lakh bank of india pandare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • ATM
  • baramati
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.