Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Tarali Project: अदाणींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका; काम तातडीने बंद करण्याचे आदेश, तीन दिवसांत खुलासा मागितला

Adani Tarali Project: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सुरू असलेल्या अदाणी समूहाच्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला महाराष्ट्र वनविभागाने दणका दिला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी न घेता प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे चौकशीत आढळल्याने वनविभागाने काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 16, 2026 | 05:21 PM
अदाणींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका; काम तातडीने बंद करण्याचे आदेश, तीन दिवसांत खुलासा मागितला

अदाणींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका; काम तातडीने बंद करण्याचे आदेश, तीन दिवसांत खुलासा मागितला

Follow Us
Follow Us:
  • अदानींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका!
  • राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगीच नाही?
  • वनविभागाची कारणे दाखवा नोटीस
  • तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश
अनिल कदम / उंब्रज : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सुरू असलेल्या अदानी समूहाच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाभोवती सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रकल्पाच्या कामकाजाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) अनिवार्य पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने वनविभागाने थेट अदानी प्रकल्प व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ही नोटीस काढली असून, तीन दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तारळी प्रकल्पाच्या कायदेशीर परवानग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Adani Tarali Project)

विशेष म्हणजे, तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम सुरू असताना पर्यावरणीय आणि वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन झाले आहे का, याबाबत यापूर्वीही पर्यावरणप्रेमींकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. आता खुद्द वनविभागाच्या अधिकृत नोटिशीत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे नमूद करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे गांभीर्य प्राप्त झाले आहे.

Ratnagiri: व्यापाऱ्यांनो चिंता करू नका! रस्ता रुंदीकरणात कोणाचेही नुकसान नको; उदय सामंतांच्या सूचना

पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू कसे केले?

वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), पाटण कार्यालयाकडून अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्याला पाठविण्यात आलेल्या नोटिशीत वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ तसेच महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियमातील तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद आहे.

संबंधित क्षेत्रातील वन्यजीव आणि वनसंपत्तीच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वनविभागाने प्रकल्प व्यवस्थापनाला काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. सक्षम प्राधिकरणाची आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी प्राप्त होईपर्यंत तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेले सर्व प्रकारचे कामकाज थांबविण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.

तीन दिवसांत परवानग्यांचा हिशेब द्या!

वनविभागाने अदानी प्रकल्प व्यवस्थापनाकडे तीन महत्त्वाच्या बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसताना प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकारात आणि कोणत्या कायदेशीर आधारावर सुरू करण्यात आले, याचा लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वन्यजीव संरक्षणाशी संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी आणि इतर आवश्यक मंजुरी मिळाल्या आहेत का, याची माहिती मागविण्यात आली आहे.

याशिवाय प्रकल्पाच्या कामकाजादरम्यान वृक्षतोड करण्यात आली असल्यास त्यासाठी किती झाडांच्या तोडणीची परवानगी घेण्यात आली, त्या परवानगीचा मूळ आदेश किंवा साक्षांकित प्रत सादर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरींची कागदपत्रे आणि नकाशेही वनविभागाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास वन कायद्यानुसार पुढील कारवाई आणि दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

सयाजी शिंदेंच्या तक्रारीनंतर प्रकरणाला नवे वळण!

तारळी प्रकल्पातील कथित अनियमितता, पर्यावरणीय नुकसान, उत्खनन आणि आवश्यक परवानग्यांचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला आहे. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत तारळे पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या प्रकल्पाच्या परवानग्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दरम्यान, प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन झाल्याचे आरोप, दोन लाख ब्रास मुरूम उत्खननाचा व्यक्त करण्यात येत असलेला अंदाज आणि शासनाच्या रॉयल्टी महसुलाबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे प्रकल्पाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. आता वनविभागाच्या नोटिशीमुळे प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरींचा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसताना काम सुरू झाले असेल, तर त्याला जबाबदार कोण? प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबंधित परवानग्यांची खातरजमा कोणी केली? स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केले का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार?

वनविभागाच्या अधिकृत नोटिशीमुळे तारळी प्रकल्प व्यवस्थापनासमोर कायदेशीर परवानग्यांचा हिशेब सादर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. तीन दिवसांच्या मुदतीत अदानी प्रकल्प व्यवस्थापन कोणता खुलासा करते, कोणती कागदपत्रे सादर करते आणि वनविभाग पुढे कोणती कारवाई करतो, याकडे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या निसर्गसंपत्तीशी तडजोड केली जाणार का? पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास मोठ्या उद्योगसमूहावरही कायद्याचा बडगा उगारला जाणार का? वनविभागाच्या या नोटिशीने तारळी प्रकल्पातील कामकाजावरच नव्हे, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Web Title: Adani tarali project forest department show cause notice work stopped sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Adani
  • maharashtra

संबंधित बातम्या

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप
2

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
3

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
4

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.