Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2026 | 04:41 PM
गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • गुजरातच्या जेलमधून माफिया राज
  • केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात
  • हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली आहे. गुजरातच्या जेलमधूनच माफिया राज चालवले जात असून केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे.

 

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना धमक्या दिल्या जात आहेत, हल्ले केले जात आहेत. अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर आता अभिनेते अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले जात आहे. हल्ल्याच्या भितीमुळे अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेमागून चाहत्यांना भेटत आहेत, ही परिस्थिती गंभीर आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असा दावा सरकारने केला होता पण दहशतवाद व गुंडगिरी अधिक जोमाने फोफावली आहे. काँग्रेस सरकार असताना अभिनेते खुलेआम फिरत होते, आज तशी परिस्थिती राहिली नाही. बॉलिवूडमधील आजची भितीची स्थिती पाहता लोक म्हणत आहेत की, ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, असे सपकाळ म्हणाले.

डिलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध

डिलिमिटेशन विधेयकामुळे खासदारांची संख्या ५५० वरून ८५० वाढणार आहे. पण लोकप्रतिनिधींची संख्याच वाढवायची असेल तर फक्त खासदारांची संख्या का वाढवता. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचीही संख्या वाढवली पाहिजे. या विधेयकाला काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीचा पहिल्यापासूनच विरोध आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (श.प.) खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली तरी इंडिया आघाडीचा विरोध कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) सुद्धा या विधेयकासंदर्भात आवश्यक पावले उचलेल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भारताची बदनामी एपस्टिन फाईलमुळे

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांच्यामुळे भारताची जगात बदनामी होत नाही तर मोदी सरकारच्या मंत्र्याचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्याने बदनामी होत आहे. विरोधी पक्षाचे नेते, न्यायाधीश यांच्या फोनमध्ये पेगॅसेस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केल्यामुळे, विरोधी पक्षनेते संसदेत बोलत असताना त्यांचा माईक बंद केल्यामुळे, महागाई, बेरोजगारी, हंगर इंडेक्समुळे भारताची जगात बदनामी होत आहे. राहुल गांधी हे समाजातील विविध घटकांना भेटत असताता, हमाल, मॅकेनिक, शेतकरी, विद्यार्थी, पीडित यांना तर भेटतातच पण राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४५०० किलोमिटरची पदयात्रा काढून सर्वांशी संवाद साधला आहे, आता गरज अमित शाह यांनी सुरक्षा बाजूला सारून जनतेत मिसळण्याची आहे, असेही सपकाळ म्हणाले.

रोहित पठारेची हत्या संताप आणणारी

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये रोहित पठारे या तरुणाची हत्या संताप आणणारी आहे. या प्रकरणी पोलीस तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांची ओळख परेड कुटुंबियांसमोर केली नाही. उलट रोहित पठारे यांच्या कुटुंबालाही धमक्या येत आहेत. राज्यात अशा प्रकारच्या हत्या होत असताना गृहमंत्री पदावर राहण्याचा देवेंद्र फडणवीस यांना अधिकार नाही, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या रोहित पठारे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा : हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

महाराष्ट्र NSUI चे अभियान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र NSUI ने शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू या अभियानाची सुरुवात केली. झाडे जगवा, पर्यावरण वाचवा यासह शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात NSUI राज्यभर हे आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात विधिमंडळात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार वजाहत मिर्झा, राहुल बोंद्रे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत काय आरोप केला?

    Ans: राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून माफियांकडून खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या परिस्थितीवरून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

  • Que: डिलिमिटेशन विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे?

    Ans: खासदारांची संख्या वाढविणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेससह इंडिया आघाडीचा विरोध असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींची संख्या वाढवायची असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्याही वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • Que: रोहित पठारे हत्या प्रकरणावर सपकाळ यांनी काय म्हटले?

    Ans: वैजापूरमधील रोहित पठारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कुटुंबीयांनाही धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात ते रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has leveled a serious allegation against amit shah nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra

संबंधित बातम्या

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप
1

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
3

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड
4

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.