Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

बारामती वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 09:49 PM
बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
बारामती: शहर शांत, सुंदर आणि कायम सुरक्षित राहावं ,या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने अखेर शहरात ध्वनीप्रदूषणाचा कहर करणाऱ्या ‘फटाका सायलेंसर’वाल्या बुलेटस्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना, दंडात्मक कारवाया याला केराची टोपली दाखवणाऱ्या टवाळखोरांना चाप लावत आतापर्यंत तब्बल ५८ बुलेट गाड्यांचे फटाका सायलेंसर जागेवरच काढून त्यावर बुलडोझर चालवला.
या मोहिमेमुळे शहरातील गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत ‘धडधड’ करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. ही विशेष मोहीम उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात ५६ कारवाया करण्यात आल्या होत्या, तर यावर्षी सुरुवातीपासूनच पोलिसांनी गती वाढवत ५८ कारवाया करत ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना एकूण १११ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ५८ बुलेटस्वारांचे सायलेन्सर वर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड, वाहतूक पोलीस निरीक्षक यादव आणि पोलीस जवान उपस्थित होते.
फॅशन, स्टाईल आणि अटेंशन मिळवण्यासाठी अनेक तरुण मूळ बुलेट गाड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करून ‘फटाका सायलेंसर’ लावतात. हे सायलेंसर इतका मोठा आवाज करतात की लहान मूल रडू लागतं, वृद्धांचा थरकाप उडतो, आणि आजारी रुग्णांची झोप उडते. महाविद्यालय परिसर, हॉस्पिटलजवळ, सिग्नलच्या रांगेत या गाड्यांचा आवाज म्हणजे एक ‘ध्वनी दहशत’ बनली होती. पोलिसांनी अनेक वेळा सूचनाही केल्या, पण कायद्याचा धाक राहिलेला नाही हे पाहून मोटार वाहन कायद्यातील कलम १९८ अंतर्गत थेट कारवाईचा निर्णय घेतला. वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे पोलीस जवान प्रदीप काळे रूपाली जमदाडे सुधाकर जाधव प्रशांत चव्हाण अशोक झगडे रेश्मा काळे सीमा घुले स्वाती काजळे माया निगडे सीमा साबळे अजिंक्य कदम आणि गृह रक्षक दलाचे जवान अमन मंडले रोहित शिंदे अभिषेक टेके यांनी केली..
कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. शहर शांत ठेवायचं असेल तर कायदा पाळणं गरजेचं आहे.जो कायदा मोडेल त्यावर कारवाई निश्चित आहे.
सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती.
मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आपल्या परिसरात असतील तर तत्काळ 9923630652 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे अथवा मेसेज करून कळवावे. अशा हुल्लडबाजांवर वर कारवाई करण्यात येईल.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक.

Web Title: Baramati traffic police has taken action against 111 bullet silencers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Baramati Police

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

राखी बांधून परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू; रक्षाबंधनाच्या दिवशीच तुटला बहीण- भावाच्या नात्याचा रेशीमधागा
3

राखी बांधून परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू; रक्षाबंधनाच्या दिवशीच तुटला बहीण- भावाच्या नात्याचा रेशीमधागा

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
4

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.