crime (फोटो सौजन्य : social media)
बीड मध्ये खासगी क्लासमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षक विजय पवार विरोधात आणखी एका पालकाने तक्रार दाखल केली आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला असल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या; चिठ्ठीत दोन पोलिसांवर आरोप
पालकाची तक्रार काय?
माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅडटच करायचा, असा आरोप या पालकांनी विजय पवारवर केला आहे. याप्रकरणात कारवाई करण्यात यावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारींचे पत्र देण्यात आले असून या तक्रारींवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलीस कोठडीत वाढ
विजय पवार आणि प्रशांत खटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. हे दोघेही नीटची तयारी करणाऱ्या मुलींची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. हा प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र. शिक्षकांकडून होणार त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यामुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. या तक्रारीनंतर दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजार करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने आता पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.