बुलढाणा: वर्ग शिक्षकाने रागावल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवलं होत. मृतकाचे नाव विनायक महादेव राऊत (वय 15, रा. वसाडी बु.) असे आहे. विनायक बजरंग विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत होता. या घटनने बुलढाण्यात हळहळ व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला गाडीत बसवून बंदुकीच्या धाकाने लैंगिक संबंधांची मागणी
नेमकं काय घडलं?
विनायक शाळेत गेला या वेळी वर्ग शिक्षकाने त्याला रागावले वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही. त्यावरून वर्ग शिक्षक रागावले व तुझ्या आई वडिलांनातू अभ्यास करत नाही, हे मी सांगेन असं म्हंटल यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहीली. यामध्ये सुर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले, आई-वडिलांवरूनही बोललेत त्यामुळे मी फाशी घेत आहे, असं लिहिलं आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. विनायकने आपलं जीवन संपवण्याआधी त्यामागं काय कारण आहे, त्याबाबतची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षक सूर्यवंशी यांनी मानसिक छळ केला, तसेच त्याच्या पालकांविषयी अपशब्द वापरून अपमान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशींना ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित 3 शिक्षक यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवर्तन करत होते. त्याविरोधात तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी येथेच नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या; चिठ्ठीत दोन पोलिसांवर आरोप