काय घडलं नेमकं?
डॉ. मंदार दाभाडे ते ‘स्वाराती’ रुग्णालयात पदव्युत्तर उच्च शिक्षण घेत होते. उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवाकरण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते अंबाजोगाई येथील चनई परिसरातील रोहिदास नगर भागात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.आज सकाळपासूनच त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आणि बराच वेळ झाला तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार हाक मारून आणि फोन करूनही जेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा परिसरातील नागरिकांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संशय बळावला.
या घटनेची माहिती तातडीने अंबाजोगाई शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता डॉ. मंदार दाभाडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला असून या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कारण अद्याप अस्पष्ट
डॉ. मंदार दाभाडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट आहे का, पोलीस त्यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स आणि अलीकडच्या काळातील वागण्याबाबत सहकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. जेणेकरून या मृत्यूमागचे गूढ उकलण्यास मदत होईल. सध्या या घटनेमुळे पूर्ण अंबाजोगाई शहरात एकच चर्चा सुरू असून डॉक्टर दाभाडे यांच्या मूळ गावी आणि त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
Ans: अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात.
Ans: डॉ. मंदार दाभाडे, PG शिक्षण घेत असलेले निवासी डॉक्टर.
Ans: कारण अद्याप स्पष्ट नाही; पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.






