Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: १ कोटी ३ लाखांहून अधिकचा घोटाळा अन् कारवाईची भीती; नांदूरघाटच्या सरपंच अपात्र; फौजदारी गुन्ह्याचे आदेश!

Beed News: प्रत्यक्ष काम न करताच ५९ लाख उचलले अन् पैसे भरूनही अडकले! केजच्या नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता जाधव अपात्र; १.०३ कोटींच्या अपहाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 02:57 PM
Beed News: १ कोटी ३ लाखांहून अधिकचा घोटाळा अन् कारवाईची भीती; नांदूरघाटच्या सरपंच अपात्र; फौजदारी गुन्ह्याचे आदेश!

Beed News: १ कोटी ३ लाखांहून अधिकचा घोटाळा अन् कारवाईची भीती; नांदूरघाटच्या सरपंच अपात्र; फौजदारी गुन्ह्याचे आदेश!

Follow Us
Follow Us:
  • सरपंच सुनिता जाधव १.०३ कोटींच्या मनरेगा निधी अपहारप्रकरणी अपात्र
  • बोगस खर्चासह मोजमाप पुस्तिका व खर्चात तफावत आढळली
  • व्याजासह वसुली व फौजदारी गुन्ह्यांचे आदेश; भरलेल्या ३३.१५ लाखांवरून अपहार मान्य
Beed News: ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक निधीचा अपहार करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील वाघोलीनंतर आता केज तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता युवराज जाधव यांना तडकाफडकी अपात्र ठरवण्यात आले आहे. मनरेगा (MGNREGA) अंतर्गत रस्त्यांच्या कामात तब्बल १ कोटी ३ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अंतिम निर्णय देत अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यासह दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

निधीचा अपहार नेमका कसा झाला?

चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मंजूर २६ रस्त्यांच्या कामांपैकी १३ रस्त्यांच्या मोजमाप पुस्तिका चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. धक्कादायक म्हणजे, आठ रस्त्यांवर कोणतेही प्रत्यक्ष काम न करताच ५९ लाख ४६ हजार ४१३ रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. याशिवाय १२ रस्त्यांच्या कामांमध्ये वितरित निधी आणि प्रत्यक्ष खर्चात ४४ लाख ४३ हजार ६७ रुपयांची तफावत आढळली.

कारवाईच्या भीतीने भरलेले पैसेच ठरले पुरावा

कारवाईची टांगती तलवार लक्षात येताच सरपंचांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत खात्यावर ३३ लाख १५ हजार १४७ रुपये जमा केले होते. मात्र, या भरणा पावत्यांच्या आधारे संबंधित रकमेचा अपहार झाल्याचे सरपंचांनी अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी नोंदवला.

हेही वाचा: FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

प्रशासनाची भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका

या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनीही भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नांदूरघाटच्या सरपंच सुनिता युवराज जाधव यांना का अपात्र ठरवण्यात आले आहे?

    Ans: मनरेगा अंतर्गत रस्त्यांच्या कामात १ कोटी ३ लाखांहून अधिक रकमेचा निधी अपहार केल्याचे आणि कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे.

  • Que: या प्रकरणात कोणकोणत्या अनियमितता आढळून आल्या?

    Ans: आठ रस्त्यांवर प्रत्यक्ष काम न करताच ५९,४६,४१३ रुपयांचा खर्च दाखवणे, १३ रस्त्यांच्या मोजमाप पुस्तिका न देणे आणि १२ रस्त्यांच्या खर्चात ४४,४३,०६७ रुपयांची तफावत आढळून आली.

  • Que: विभागीय आयुक्तांनी पुढे कोणते आदेश दिले आहेत?

    Ans: अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करणे आणि या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Beed kej sarpanch disqualified mgnrega fund misappropriation sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Beed
  • Sarpanch News

संबंधित बातम्या

Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…
1

Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.