सौजन्य फोटो - AI Gemini
मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल प्रजापती हा मुंबई-इगतपुरीमार्गे प्रवास करत शनिवारी दुपारी एका खासगी वाहनाने राजूर येथे आला होता. तेथे पोहोचल्यानंतर त्याने एका हॉटेलचालकाच्या फोनवरून आपल्या आई आणि वडिलांशी संपर्क साधला होता. या संभाषणादरम्यान “कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करत आहे,” असे धक्कादायक विधान त्याने केले होते. यानंतर खुशालचा कोणताही फोन न आल्याने आणि त्याचा पत्ता न लागल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, गडावर गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना कोकणकड्याच्या खोल दरीत एक मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती राजूर पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबीयांना पाचारण केल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली, यावेळी घटनास्थळी कुटुंबीयांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. कोकणकड्याची खोली आणि कठीण भौगोलिक परिस्थिती पाहता लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या बचाव पथकाची मदत घेण्यात आली आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र, खुशालला नेमकं कोण ब्लॅकमेल करत होतं, याचा तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
हिवाळ्यात हरिश्चंद्रगडावर जाणे हा सुंदर अनुभव असला, तरी अपुरी माहिती आणि अतिउत्साह पर्यटकांच्या जिवावर बेतत आहे. कोकणकड्याला सुरक्षेसाठी ग्रील लावलेले असतानाही अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून कड्याच्या टोकावर बसण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी एका बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत असताना कोकणकड्याच्या ८०० फूट खोल दरीत सिल्वासा येथील रोहित सोळुंके आणि लातूर येथील गणेश होनराव या दोन तरुणांचे सांगाडे सापडले होते. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड आता मृत्यूचे केंद्रबिंदू ठरतोय का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.
Ans: राजस्थानमधील २० वर्षीय खुशाल चेनाराम प्रजापती असे या मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: राजूर येथे आल्यानंतर त्याने एका हॉटेलचालकाच्या फोनवरून आई-वडिलांना कॉल करून 'कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे' सांगितले होते.
Ans: वन कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर राजूर पोलिसांना कळवले आणि त्यानंतर लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला.






