crime (फोटो सौजन्य: social media)
बीड जिल्ह्यातील सिरसाळायेथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. सिरसाळा – मोहा रस्त्यावरील खंडणी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी डोक्यात फावडा घातला, नंतर गळा आवळला आणि…..; पत्नीच्या प्रियकराने केली पतीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांचे नाव राम धोत्रे, करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार असे आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी राम धोत्रे याने गावठी कट्टा करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. संशयितांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं असून, त्यांच्याकडे आणखी कोणते हत्यार होते का, याचा तपास सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच यांच्या हत्येनंतर अनेक बीडचे गुन्हेगारी सत्य समोर आले आहे. दररोज तिथे होणारे हत्या, दहशत माजवणे, किरकोळ कारणाने हाणामारी करणे, खंडणी मागणे, गावठी काट्यांचा व्यवसाय, अश्या अनेक घटना समोर आल्या आहे. बीडमध्ये चाललंय तरी काय? बीड मध्ये कायदा सुव्यवस्था आहे उरला आहे की नाही? अशे अनेक प्रश्न सतत विचारण्यात येत आहे. आता बीड पोलिसांनी गावठी कट्ट्यासह तिघांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने पिस्तुलाचा धाक दाखवत स्वतःसोबत राहण्यास भाग पडले, अत्याचार केले…
दरम्यान, बीड पोलीस अधिकाऱ्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धाराशिवमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. धाराशीव येथील एका पोलीस निरीक्षकाने पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला ही मूळ बीडची आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.
पीडितेने तक्रारीत काय म्हंटले आहे
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची ओळख विवाहितेशी २०१३ मध्ये झाली, जेव्हा शिंदे बीड पोलीस दलात कार्यरत होता. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. बीडमधून शिंदेची धाराशिवला बदली झाली तेव्हा सुद्धा त्याने वारंवार पिस्तुलाच्या धाकावर अत्याचार केला. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने धाराशिव येथे सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
Raigad News : MIDC मध्ये अंमली पदार्थांचा साठा ; गुन्हेशाखेची मोठी कारवाई