Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला

बंगळुरूमध्ये प्रेमसंबंधांना विरोध होत असल्याच्या रागातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या वडिलांना फोन करून आरोपीने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता तरुणी मृत अवस्थेत तर आरोपी बेशुद्ध अवस्थेत आढळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 02:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधांना विरोध असल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप.
  • मुलीच्या वडिलांना फोन करून आरोपीने खुनाची कबुली दिली.
  • मृतदेहाशेजारीच आरोपी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ.
बंगळूरू: बंगळुरूमधील ब्यादराहल्ली परिसरातून एक धक्कादायक प्रेमप्रकरण समोर आलं आहे. प्रेमसंबंधांना विरोध होत असल्याच्या रागातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या वडिलांना फोन करून “मी तुझ्या मुलीला मारलं” अशी कबुली दिल्यानंतर आरोपी तिच्या मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

एम भवानी असे मृत तरुणीचे नाव असून ती घरात एकटी होती. भवानीचे चंद्रशेखर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या वडिलांना हे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी भवानीचे लग्न दुसरीकडे ठरवण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणातून आरोपी चंद्रशेखर संतप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेच्या दिवशी भवानीच्या वडिलांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन भवानीऐवजी चंद्रशेखरने उचलला. त्यावेळी त्याने “मी तुझ्या मुलीला मारलं आहे, तुला जे करायचं ते कर,” असे सांगितल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी तात्काळ भवानी राहत असलेल्या घरमालकाला आणि पोलिसांना माहिती दिली.

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भवानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, भवानीच्या मृतदेहाशेजारीच आरोपी चंद्रशेखर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला का किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे बंगळुरूच्या ब्यादराहल्ली परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सावळं होणं ठरलं कारण! आईने प्रियकरासोबत मिळून 6 वर्षांच्या मुलीची केली हत्या, 3 महिन्यांनंतर पापाचा झाला खुलासा

आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बंगळूरुमध्ये घडली आहे. इथे आईनेच प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या मुलीचा खून केला आणि नंतर त्याला नैसर्गिक मृत्यू झाला आहे असे भासवले. या घटनेत खरा ट्विस्ट तीन महिन्यांनंतर जेव्हा आईचा हा कांड उघडकीस आला. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच आईने केलेल्या क्रुर कृत्याची माहिती पोलिसांना लागली आणि त्यांनी तातडीने महिलेच्या प्रियकराला अटक केली. मुख्य आरोपी आई अद्याप फरार आहे.

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: एम भवानी असे मृत तरुणीचे नाव होते.

  • Que: या घटनेमागचं प्राथमिक कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: प्रेमसंबंधांना मुलीच्या वडिलांचा विरोध आणि दुसरीकडे लग्न ठरवणे हे कारण असल्याचे समोर आले आहे.

  • Que: पोलिसांना घरात काय आढळले?

    Ans: पोलिसांना भवानी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आणि आरोपी चंद्रशेखर बेशुद्ध अवस्थेत आढळला.

Web Title: Bengaluru crime i killed your daughter lover murders girlfriend found unconscious beside the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं
1

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात
2

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक
3

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत
4

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.