Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

भाईंदरमध्ये रस्त्यावरून चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाला अचानक हिंसक वळण मिळाले. वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली आणि याच झटापटीदरम्यान एक तरुण ट्रेलरच्या चाकाखाली आला. या भीषण घटनेत साईनाथ चौहान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, हाणामारीच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती आणि साईनाथ ट्रेलरखाली कसे आले, य

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 26, 2026 | 04:50 PM
Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यावरून सुरू झाला किरकोळ वाद
  • धक्कबुक्की दरम्यान तरुण ट्रेलरखाली आल्याने जागीच मृत्यू
  • ओला-उबर चालकांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहीती
भाईंदर: भाईंदरमध्ये रस्त्यावरून चूकीच्या दिशेने वाहन चालवण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाले आणि झटापटीदरम्यान तरुण ट्रेलरच्या चाकाखाली आला. घटनेत साईनाथ चौहान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, झटापटीत नेमके काय घडले आणि तरुण ट्रेलरखाली कसा आला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

रस्त्यावरून चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या झटापटीदरम्यान एका तरुणाचा ट्रेलरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. भाईंदर परीसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. साईनाथ चौहान असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहीती आहे. ते टेंबा हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्तावरून चूकीच्या बाजूने येण्याच्या मुद्यावरून काही व्यक्तींमध्ये सुरूवातीला शाब्दिक वात झाला. काही वेळातच हा वाद वाढत गेला
आणि संबंधित व्य़क्तींमध्ये धक्काबुक्की तसेच मारामारी सुरू झाली. प्राथमिक माहीतीनुसार, ओला-उबर चालकांचाही या वादात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Accident News: सुपौलमध्ये भरधाव कारने कीर्तन करणाऱ्या भाविकांना चिरडले; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

झटपटीदरम्यान ट्रेलरखाली आला

मारामारी सुरू असतानाच त्याचा रस्त्यावरून एक ट्रेलर जात होता. धक्काबुक्की सुरू असताना साईनाथ चौहीन यांचा तोल गेला किंवा झटापटीदरम्यान ते ट्रेलरच्या दिशेने गेले. त्याचवेळी ते ट्रेलरच्या चाकाखाली आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

 

नेमके काय घडले?

या प्रकरणामागील नेमका वाद काय होता,मारामारीत किती जण सहभागी होते आणि साईनाथ चौहान ट्रेलरखाली नेमके कसे आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींची माहिती तपासात महत्त्वाची ठरणार आहे.

या घटनेप्रकरणी नगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. किरकोळ वाहतूक वादातून झालेल्या या घटनेने रस्त्यावरील वाद किती गंभीर रूप धारण करू शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

Web Title: Bhayandar crime bhayandar crime young man dies tragically following a minor dispute in bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.