Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

भिवंडीतील कशेळी परिसरात ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पैशांचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप असून, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 02:11 PM
Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार.
  • पोलासांनी आरोपीला अटक केली असून स्थानिकांमध्ये असंतोष.
  • पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गुरुवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली. चिमुकली भावासोबत घराखाली खेळत होती. अशात आरोपीची वाईट नजर तिच्यावर पडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे. नरसापूर प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरु केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीचे वय अल्पवयीन असल्याचे समोर येत आहे.

‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन…’, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

चिमुकला रुग्णालयात दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षांची पीडित मुलगी तिच्या १० वर्षांच्या भावासोबत इमारती खाली खेळत होती. यावेळी आरोपी दोघांजवळ गेला आणि त्याने दोघांना खाऊचे आमिष दाखवले. भावाकडे ५० रुपये देऊन आरोपीने त्याला पाणी आणण्यासाठी पाठवले आणि मुलीला घेऊन इमारती पासून तीन ते चार बिल्डिंग लांब तो त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर गेला. आरोपीने चिमुकलीचे प्रथम हात-पाय बांधले, तिच्या तोंडावर पट्टी बांधली आणि मग तिच्यावर बलात्कार केला. या क्रुर घटनेनंतर मुलीची प्रकृती बिघडली असून तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपीला अटक

संध्याकाळी चिमुकली घरी परतल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. ही माहिती मिळताच कुटुंबीय हादरले आणि त्यांनी तत्काळ सायंकाळी सुमारे सात वाजता नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने तातडीने संशयिताचा शोध सुरू केला. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत फरार संशयिताला अटक केली. आरोपीचे वय १८ वर्षे असून त्याची ओळख अंकित गिरी अशी पटली आहे.

Fraud News : तीन कोटींचे आमिष, 7.35 लाखांचा गंडा; ‘अशी’ झाली फसवणूक उघड

स्थानिकांमध्ये संतापाची लाट

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अशा नराधमाला कोर्टात न नेता पोलिसांनी त्याचा थेट एनकाऊंटर करावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

 

Web Title: Bhiwandi kasheli 7 year old girl sexual assault accused arrested in two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • bhiwandi
  • Rape on Girl
  • thane

संबंधित बातम्या

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
1

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन
2

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण
3

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण

Maharashtra Heritage: घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी
4

Maharashtra Heritage: घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.