Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

Thane Ring Metro: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे शहरांतर्गत प्रस्तावित रिंग मेट्रो आता मुंबई, भिवंडी आणि कल्याण या महत्त्वाच्या शहरांशी जोडली जाणार आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ५ शी जोडणी झाल्यामुळे ठाणेकरांचा शहरांतर्गत तसेच एमएमआरमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 23, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • ठाणे शहरांतर्गत रिंग मेट्रो मुंबई, भिवंडी आणि कल्याणशी जोडली जाणार
  • बाळकुम नाका परिसरातून मेट्रो मार्गिका ५ शी कनेक्टिव्हिटी मिळणार
  • ठाणेकरांना मुंबई, भिवंडी आणि कल्याणकडे प्रवास करणे अधिक सोयीचे होणार
 

 

स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे चर्चेत आलेली ठाणे शहरांतर्गत रिंग मेट्रो आता मुंबई, भिवंडी आणि कल्याण या महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत अंतर्गत रिंग मेट्रो ही वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गिका ४ आणि कापूरबावडी-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ शी जोडली जाईल. यामुळे ठाणेकरांना केवळ शहरांतर्गत प्रवास करणेच सुलभ होणार नाही, तर निश्चित स्थानकांवर मेट्रो बदलून मुंबई, भिवंडी आणि कल्याणच्या दिशेने विनाअडथळा आणि वेगवान प्रवास करता येणार आहे.

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महामेट्रोच्या माध्यमातून तब्बल १२ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प राबवला जात आहे.

मेट्रोचे जाळे मुंबईशी जोण्याची व्यूहरचना

गेल्या काही दिवसांत लोकमान्य नगरसह ठाण्यातील काही भागांतून विस्थापन आणि मार्गावरून विरोध दर्शवला गेला होता. मात्र, महामेट्रोने नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली असून, या मेट्रोचे जाळे मुंबई महानगर जोडण्याची व्यूहरचना आखण्यात प्रदेशातील इतर प्रमुख मार्गाशी झाली आहे.

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

खाजगी वाहनांचा भार कमी होणार

या बहुउद्देशीय जोडणीअंतर्गत मेट्रो मार्गिका ४ शी डोंगरीपाडा परिसरात अंतर्गत रिंग मेट्रोचे स्थानक जोडले जाईल, ज्यामुळे ठाणेकरांना घेट मुंबईच्या दिशेने जलद बाळकुम नाका येथे मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल. तर मार्गिका ५ शी जोडणी दिली जाणार असल्याने प्रवाशांना थेट भिवंडी व कल्याणच्या दिशेने प्रवास करणे सोयीचे होईल. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईना होणार आहे.

एकाच तिकीट प्रणालीवर संपूर्ण एमएमआर भागात प्रवास

अथवा कल्याणकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड सध्या घोडबंदर रस्ता, तीन हात नाका आणि कापूरबावडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोडीमुळे मुंबई, भिवडी हाल होतात. मात्र, रिंग मेट्रोचे जाळे मेट्रो ४ आणि ५ ला जोडले गेल्यामुळे प्रवाशांना एकाच तिकीट प्रणालीवर मेट्रो बदलून संपूर्ण एमएमआर भागात प्रवास करता येईल, भविष्यातील ठाण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे काम आता गतीने सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

नागरिकांशी संवाद सुरूः महामेट्रो

ठाणे रिंग मेट्रो हा प्रकल्प सुरक्षित, सुखकर आणि वेळेची बचत करणारा असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या मार्गामुळे ठाण्यातील अंतर्गत भागांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळेलच, शिवाय बाळकुम नाका येथे मेट्रो ५ शी जोडणी मिळाल्यामुळे प्रवाशांना भिवंडी आणि कल्याणसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प साकार करण्यासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला आहे. सविस्तर डीपीआर ठाणे रिंग मेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. ज्या नागरिकांच्या मनात काही शंका किवा प्रश्न आहेत, त्यांच्याशी आमचा निरंतर संवाद सुरू असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध असल्याची माहिती महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane ring metro mumbai bhiwandi kalyan connectivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • metro news
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!
1

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!
3

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल
4

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.