Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News: भिवंडीत मध्यरात्री आगीचा कहर; दोन ठिकाणी गोदामे जळाली, मोठं नुकसान

भिवंडी तालुक्यातील निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत मध्यरात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. टायर, प्लास्टिक आणि लाकडाच्या गोदामांना लागलेल्या आगीत अनेक गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 08:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • निंबवलीत टायर, लाकूड आणि प्लास्टिक गोदामांना भीषण आग.
  • येवई गावात लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी.
  • अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा थरार पाहायला मिळाला. निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीत अनेक गोदामे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिली घटना

पहिली घटना भिवंडी तालुक्यातील निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम, लाकडाची वखार आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. मध्यरात्री 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तब्बल सात ते आठ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळालगत गॅस एजन्सी असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

दुसरी घटना

दुसरी घटना याच रात्री येवई गावाच्या हद्दीत लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण वखार जळून खाक झाली. या गदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा होता. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

सुदैवाने या दोन्ही वेगवेगळ्या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत लागलेल्या या आगीत (Bhiwandi News) संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहेत .

मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारची सुरा भोसकून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाच्या (३०) चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आरोपीने ऑनलाइन मागवल्याचे रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता थेट ‘ई-कॉमर्स’ कनेक्शन मिळाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंची आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी संबंधित चाकू ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर आले. आरोपीने काही दिवसांपूर्वीच हा चाकू मागवला होता का, की तो यापूर्वीपासून त्याच्याकडे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.

Ketan Agrawal Murder Case : ‘केतनचे डोके होते ठेचलेले, हातापायांवरही जखमा’; गायकवाड यांनी केला धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: भिवंडीत आग कुठे लागली?

    Ans: निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली.

  • Que: आगीत कोणते नुकसान झाले?

    Ans: अनेक गोदामे जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले.

  • Que: या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली का?

    Ans: नाही, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Web Title: Bhiwandi news midnight fire havoc in bhiwandi warehouses gutted at two locations massive losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • crime
  • Fire News

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.