
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
मुलीची आणि प्रियकराचे संबंध होते या संबंधांमधून मुलगी गर्भवती राहिली, तिला प्रस्तुती कळा मोठ्या प्रमाणावर येत होत्या म्हणून तिला मुलीला एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिने एका सदडून मुलीला जन्म दिला. मात्र तिला रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मोठ्या रुग्णालयामध्ये नेण्याची विनंती करण्यात आली. पुढील उपचार जे आहेत ते मोठ्या रुग्णालयामध्ये करा असं डॉक्टरांनी सल्ला दिला होता. मात्र तिला रुग्णवाहिकेतून नेण्याऐवजी तिला खाजगी गाडीमधून नेण्यात आलं आणि आपली बाहेर इज्जत जाईल या कारणासाठी तिचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना बिहारच्या मध्यपूर जिल्ह्यामध्ये घडली. मुलीचं वय हे अवघ वीस वर्ष होतं.
कसा ठरला हत्येचा कट ?
जेव्हा त्या मुलीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा घरच्यांकडून हा कट रचण्यात आला. ही घटना 13 फेब्रुवारीच्या पहाटे घडली. जेव्हा मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता तेव्हा तिला डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयामध्ये हलवा असा सल्ला दिला. तेव्हा डोक्यात तिला गाडीतच गळा दाबून मारण्याचा प्लॅन करण्यात आला त्यामुळे त्यांनी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नेण्याऐवजी खाजगी गाडीमधून नेण्याचा प्रयत्न केला आणि वाटतच तिचा गळा दाबून खून करण्यात आला.
हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र…
जेव्हा मुलीची हत्या करण्यात आली तेव्हा तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भागलपुर या गंगा घाटावर नेण्यात आला. हत्येचा पुरावा नष्ट करावा या हेतून तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय वडील आणि चुलत्याने घेतला. मात्र भागल्पुर घाटावरती तिचा मृतदेह आल्यावरती गावकरी लोकांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क केला आणि या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाला भेट दिली तेव्हा बापाने बनाव रचण्याचा प्रयत्न केला. प्रियकरांनी तिचं लैंगिक शोषण केला आहे आणि त्याला धोका दिला आहे असं सांगितलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र दूरकिशनगंज एसडीपीओ यांच्या तांत्रिक तपास सुरू केला आणि 20 फेब्रुवारीला मुलीचा प्रियकर रिसीव राज उर्फ हेमराज याला ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता. त्याने धक्कादायक माहिती दिली.
मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीची हत्या केली आहे. आणि जन्मलेले जे नवजात बालिकेला एका लालपल्या पिशवीमध्ये भरून तिला पुला खाली नेऊन फेकून दिला.
जेव्हा ही माहिती तपासामध्ये प्रियकरांना दिली त्यानंतर पोलिसांची टीम त्या पुलाखाली गेली. तिथून नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला.
तिघांना अटक
तीन जणांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे. यात मुलीचा बाप, काका आणि प्रियकर यांचा समावेश आहे. गावामध्ये इज्जत जाऊ नये यासाठी मुलीचा बापाने गळा दाबून खून केला तर दुसरा बाजूला ज्या मुलीला जन्म दिला त्या बापाने लहान बाळाला पुलाखाली फेकून दिला. या घटनेला संपूर्ण बिहार हादरला आहे आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
Solapur Crime: प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल
Ans: वडील आणि काकावर.
Ans: प्रियकराने पुलाखाली फेकल्याची कबुली दिली.
Ans: तिघांना अटक; पुढील तपास सुरू.