Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: मफलरमुळे चुकलं टार्गेट! प्रियकराच्या हत्येचा कट रचला, मात्र निष्पाप तरुणाचा गेला जीव; प्रकरण काय?

बिहारच्या कैमुरमध्ये प्रियकराच्या हत्येचा कट रचण्यात आला. मात्र थंडीमुळे मफलर बांधलेल्या निष्पाप तरुणाला प्रियकर समजून गोळीबार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरुणीसह चार आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुणी सृष्टी कुमारीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकराच्या हत्येचा कट रचला
  • मफलरमुळे ओळख चुकली, निष्पाप सुशील चौरसियाचा गोळीबारात मृत्यू
  • CCTV फुटेजमधून कट उघड; तरुणीसह 4 आरोपी अटकेत
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता. मात्र एका मफलरमुळे मारेकऱ्यांचा टार्गेट चुकला आणि एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारच्या कैमुर पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. मात्र एका निष्पापाचा जीव कसा गेला? नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Beed Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले आणि चिमुकलीवर…

काय घडलं, नेमकं प्रकरण काय?

मुख्य आरोपीचे नाव सृष्टी कुमारी असे आहे. सृष्टीचे तिच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. त्याचे नाव प्रेम पासी असे. कुटुंबीयांनी सृष्टीचे लग्न दुसरीकडे ठरवले. त्यामुळे तिचा प्रियकर प्रेम हा तिच्या लग्नात अडथळा आणत होता. या सृष्टी सोबतच्या प्रेमप्रकरणाचा फायदा घेत तिला तो ब्लॅकमेल करत होता.

या सगळ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून सृष्टीने प्रेमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी सृष्टीने तिचा सावत्र भाऊ सोहेल खानची मदत घेतली. दोघांनी मिळून प्रियकराला संपवण्याची सुपारीही दिली. २१ जानेवारीच्या संध्याकाळी, सोहेल खान आणि त्याचा साथीदार आशिष पांडे हे कट रचण्यासाठी भगवानपूर बाजारात मोटार सायकलवरून गेले. त्याठिकाणी एक अल्पवयीन मुलगा त्यांना सृष्टीच्या प्रियकराचे लोकेशन सांगत होता.

दरम्यान, प्रेम पासी हा त्या परिसरात आला होता. त्याने मुन्ना मिस्त्रींच्या दुकानाबाहेर त्याची बाईक पार्क केली आणि आत गेला. सोहेल खान आणि त्याच्या साथीदारांनी सृष्टीच्या प्रियकराची गाडी ओळखली. त्यावेळी त्याच्या गाडी जवळ सुशील चौरसिया हा तरुण उभा होता. कडाक्याच्या थंडीमुळे त्याने आपला चेहरा
मफलरने गुंडाळला होता. यावेळीच मारेकऱ्यांचा टार्गेट चुकला.

मारेकऱ्यांचा टार्गेट चुकला आणि…

गाडी जवळ उभा असलेला तरुण याला प्रेम समजून त्यांनी सुशील चौरसियाच्या दिशेने गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरचा सीसीटीव्ही फुटेज तपासून काढला. तेव्हा या संपूर्ण घटनेचा कट उलघडला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहारच्या कैमुर जिल्ह्यातील भगवानपूर परिसरात.

  • Que: हत्या नेमकी का करण्यात आली?

    Ans: प्रियकर प्रेम पासी ब्लॅकमेल करत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

  • Que: निष्पाप तरुणाचा मृत्यू कसा झाला?

    Ans: थंडीमुळे मफलर बांधलेल्या तरुणाला प्रियकर समजून मारेकऱ्यांनी गोळीबार केला.

Web Title: Bihar crime the target was missed due to a muffler a plot was hatched to kill the lover but an innocent young man lost his life what is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.