मुंबई : अंबरनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी (5 एप्रिल) रात्री भाजपचे माजी नगरसेवक राजू महाडिक यांच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला केला आहे. पण हे हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांना हल्ला का केला? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात ऑफिसचं मोठं नुकसान झालं आहे.
धारधार शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या व्यक्तींनी कार्यालयात घुसून जोरदार तोडफोड केली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अंबरनाथमध्ये भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात ऑफिसचं मोठं नुकसान झालं आहे. तर यावेळी ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला केला आहे. पण हे हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांना हल्ला का केला? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नेमकं काय घडलं?
भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचे अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले 10-12 जणांचे टोळके त्यांच्या कार्यालयात शिरले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड सुरू केली. या टोळक्याने ऑफिसच्या काचा फोडल्या खुर्च्यांवर तलवारीने वार करत कार्यालयातील सामानाचे नुकसान केले. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शासकीय निवासस्थानी स्वतःवर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार निघून गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सह्याद्री हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. रात्री जेवण करून आयुक्त मनोहरे स्वतःच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक धावत आले.
आयुक्त त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रात्री बारा वाजेच्या सुमारास डॉ. हनुमंत किनीकर यांच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.यासंदर्भात नवराष्ट्रशी बोलताना डॉ. किनीकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यांना ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना वाचविण्याची शर्तीचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.