Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणारे ते ४५ बडे नेते कोण?

अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 01, 2026 | 12:22 PM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:
  • नाशिक परिसरात ४९ गुंठे जमिनीचे व्यवहार कागदोपत्री १९.५६ कोटी रुपयांना झाल्याचे पुरावे
  • पैसा ‘शिवनिका ट्रस्ट’ आणि इतर संशयास्पद मार्गांनी जमा झाल्याचा संशय
  • राज्यातील सुमारे ४५ प्रमुख राजकारणी खरातच्या नियमित संपर्कात
Ashok kharat Crime News: नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटी तपासात दररोज नवी माहिती समोर येत आहे. आता भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांच्या संपत्तीचा थक्क करणारा आकडा समोर आला आहे. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या मालकीचे १८ रो हाऊस असून, नाशिक परिसरातील ४९ गुंठे जमिनीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या जमिनीचा व्यवहार कागदोपत्री १९ कोटी ५६ लाखांना दाखवून पूर्ण केल्याचे समोर आले आहे.

शिवनिका ट्रस्ट आणि इतर संशयास्पद मार्गांनी जमा झालेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी पोफळेनेच या गुंतवणुकीचे नियोजन केल्याचा पोलिसांना संशय आहे. या मालमत्तांची खरेदी, त्यामागील आर्थिक स्रोत आणि संभाव्य बेनामी व्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात येत आहे. खरातचा सीए पोफळेच्या या व्यवहारावर सवाल उपस्थित होत आहेत. या गुंतवणुकीसाठी पोफळेकडे एवढा पैसा आला कुठून? यामागे खरातचा प्रत्यक्ष संबंध आहे का? तसेच खरात सीएकरवी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत होता का? त्याच्या काळ्या पैशांत नेत्यांचा वाटा आहे का? असे प्रश्न यामुळे उभे राहिले आहेत.

राज्यातील ४५ प्रमुख राजकारणी होते संपर्कात

अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे. या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचे दिसून येते. नाशिक येथे पार पडलेल्या या लग्नसमारंभालाही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या निमित्ताने अशोक खरात आणि विविध पक्षांतील नेत्यांमधील जवळीक अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. असेही म्हटले जाते की, हे नेते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरात यांचा सल्ला घेत असत.

 

 

Web Title: Black money and big leaders the massive financial empire of bhondu ashok kharat revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime
  • Nashik Police

संबंधित बातम्या

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
1

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.