Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govind Pansare case: कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची 16  फेब्रुवारी 2015  रोजी कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 29, 2025 | 04:23 PM
Govind Pansare case: कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  गोविंद पानसरे हत्या प्रकरण: महाराष्ट्रातील बुद्धिवादी गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना   दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. 2015  मध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली.  या प्रकरणात आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही आरोपीच्या याचिकेत म्हटले होते.

कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची 16  फेब्रुवारी 2015  रोजी कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर, राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली.  दुसरीकडे,  कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा खुलासा होईपर्यंत या प्रकरणातील तपासात कोणतेही यश येत नव्हते.  कर्नाटक एटीएसने महाराष्ट्रात येऊन गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे समोर आले.

Delhi Assembly Election: भाजपला धक्का; निवडणुकीच्या तोंडावरच बड्या नेत्याने सोडली साथ

न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या सहा आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. 2018 ते 2019  दरम्यान या सर्वांना वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून हे सर्वजण तुरुंगात आहे. सहा आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागल्याने मी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत आहे. तसेच  दुसरे आरोपी वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी  करणार असल्याचे न्या. किलोर यांनी स्पष्ट केले.

मॉर्निंग वॉक दरम्यान  गोळी झाडून केली होती हत्या

16  फेब्रुवारी 2015  रोजी कोल्हापूर येथील  सम्राट नगर भागात मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना, दोन मोटारसायकलस्वारांनी गोविंद पानसरे यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. सुरुवातीला, कोल्हापूरमधील राजारामपुरी  पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. नंतर या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला.

तासगाव पोलिसांकडून सराईत चोरट्यास अटक; 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

तीन-चार वर्षे उलटली तरी या गोविंद पानसरे- नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकऱणातील आरोपींचा शोध घेण्यात यश येत नव्हते. त्यामुळे  पानसरे यांच्या कुटुंबाने हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कोणतीही प्रगती किंवा यश न आल्याने  आणि या प्रकरणातील दोन शूटर अजूनही फरार असल्याने, 3 ऑगस्ट 2022 रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे हस्तांतरित केला.

खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश

उच्च न्यायालय या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून होते, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने असे सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले. तसेच. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करून दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Bombay high court gives relief to the accused in the comrade govind pansare case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
1

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

Rohit Pawar News: भाजपची माजी प्रवक्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी; रोहित पवारांच्या आरोपांमुळे नव्या वादाची ठिणगी
3

Rohit Pawar News: भाजपची माजी प्रवक्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी; रोहित पवारांच्या आरोपांमुळे नव्या वादाची ठिणगी

अखेर धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांलाच ठोठावला १ लाखांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण?
4

अखेर धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांलाच ठोठावला १ लाखांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.