शयित मिरजे हा संशयितरित्या दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याविषयी तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरीची कबुली दिली
संग्रहित फोटो
Follow Us:
Follow Us:
विस्तार
तासगाव : तासगाव, कराड, विटा, खालापूर व शिरोली हद्दीतील जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास पकडण्यात तासगाव पोलिसांना यश आले. शीतल मारुती मिरजे (वय ३२, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी माध्यमांना दिली. यावेळी उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ व गुन्हे प्रकटीकरणचे पथक उपस्थित होते.
घुगे म्हणाले, तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरी करण्याचे प्रकार घडले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. यादरम्यान हवालदार अमर सूर्यवंशी यांना विटा नाका, चिंचणी नाका, शिवाजी चौक परिसरात गस्तीवर असताना संशयित चोरटा दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सूर्यवंशी व पथक घटनास्थळी गेले. यावेळी संशयित मिरजे हा संशयितरित्या दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याविषयी तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून २८० ग्रॅम वजनाचे २३ लाख ५९२ किमतीचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, असा २५ लाख ५९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या पथकात सुहास खुबीकर, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, योगेश जाधव, पवन जाधव, आरती खोत यांचा समावेश होता. उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.
पुण्यातील औंध भागात घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.
विमाननगर परिसरातही चोरीची घटना
विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे.