Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखणारे बृजभूषण सिंह आता अडचणीत, कुस्तीतल्या दिग्गज खेळाडूंनी केलेत लैंगिक शोषणाचे आरोप, काय प्रकरण ?

काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari, Pune) स्पर्धेत बृजभूषण सिंह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत व्यासपीठावर होते. उ. प्रदेशातील दबंग नेते अशी त्यांची ओळख आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 19, 2023 | 03:53 PM
राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखणारे बृजभूषण सिंह आता अडचणीत, कुस्तीतल्या दिग्गज खेळाडूंनी केलेत लैंगिक शोषणाचे आरोप, काय प्रकरण ?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) जंतर मंतर (Jantar Mantar) परिसरात भारतातील दिग्गज कुस्तीपटू (Legendary wrestlers of India) सध्या आंदोलनाला (Agitation) बसले आहेत. कुस्ती संघ त्यांचं शोषण करत असल्याचं या पेहलवानांचं म्हणणंय. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh, President of Indian Wrestling Association) हे या पेहलवानांच्या टार्गेटवर आहेत (Target On Wrestlers) . बृजभूषण सिंह हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

एशियन गेम्समध्ये (Asian Games) पदकं मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Female Wrestler Vinesh Phogat) हिने तर बृजभूषण सिंह हे अनेक मुलींचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुलींच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत मुलींना त्रासा देत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. यावर प्रत्युत्तर देताना बृजभूषण सिंह यांनी हे आरोप खरे ठरले तर फासावर जाईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता हे प्रकरण केंद्र सरकारकडेही (Case In Central Government) गेलंय. क्रिडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाला याबाबत ७२ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. बृजभूषण सिंह यांच्या समर्थनार्थही काही खेळाडू पुढे सरसावल्याचं दिसतंय.

[read_also content=”मोठी बातमी! वर्कलोडमुळे ढसाढसा रडल्या ‘या’ देशाच्या PM, म्हणाल्या ‘आता बास…पुढच्या चार वर्षांचा कारभारच नको..’ https://www.navarashtra.com/world/pm-jacinda-ardern-new-zealand-to-step-down-next-month-she-will-not-contest-the-election-nrvb-362947.html”]

कोण आहेत बृजभूषण सिंह?

काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari, Pune) स्पर्धेत बृजभूषण सिंह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत व्यासपीठावर होते. उ. प्रदेशातील दबंग नेते अशी त्यांची ओळख आहे. उ. प्रदेशच्या गोंडा गावातील ते रहिवासी आहेत. सध्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदारही आहेत.

विद्यार्थी चळवळीपासून ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास आहे. बृजभूषण सिंह यांचं तरुणपण हे अयोध्येतल्या आखाड्यात गेलंय. पहेलवान म्हणून बृजभूषण सिंह स्वत:ला शक्तिशाली म्हणवून घेतात. १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुका ते सलग खासदार राहिलेले आहेत. एकूण सहा टर्म ते लोकसभा खासदार आहेत. १९८८ साली बृजभूषण सिंह यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर १९९१ साली रेकॉर्डब्रेक मतांनी ते खासदार झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपा सोडून सपाकडून खासदारकी जिंकून दाखवली. बृजभूषण सिंह २०११ पासून भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्षही आहेत. २०१९ मध्ये तिसऱ्यांदा त्यांची यापदी निवड झालीय.

बृजभूषण सिंह यांचा प्रभाव गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांत आहे. १९९९ नंतर त्यांनी एकही लोकसभा निवडणूक हरलेली नाही. त्यांचा मुलगा प्रतीक भूषण हाही राजकारण असून गोंड्याचा भाजपाचा आमदार आहे.

[read_also content=”हिरोईन बनवतो असं सांगत शेजाऱ्यांनीच महिलेला फसवले, पीडितेने गाठले एसएसपी कार्यालय, बलात्काराचा गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/crime/neighbors-cheated-mathura-crime-woman-making-a-heroine-rape-case-registered-victim-reached-ssp-office-nrvb-362925.html”]

हिंदुत्ववादी नेते अशी प्रतिमा

भआजपात आल्यानंतर हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा बृजभूषण सिंह यांनी तयार केली आहे. अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्याच्या प्रकरणातही त्यांचा सहभाग होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपाच्या ४० दिग्गज नेत्यांत त्यांचाही सहभाग आहे. सप्टेंबर २०२० साली त्यांची या सर्व आरोपांतून मुक्तता झालेली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते कुस्त्यांचे सामने आयोजित करीत असत. त्यांच्यावर यापूर्वी हत्या, खंडणी, तोडफोड, मारहाणीचे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. एसयूव्ही गाड्यांचे शऔकिन अशीही बृजभूषण सिंह यांची ओळख आहे. लखनौच्या लक्ष्मणपुरी परिसरात त्यांचा मोठा बंगलाही आहे.

राज ठाकरेंना केला होता विरोध

[blurb content=”गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यावेळी याच बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी परप्रातियांची माफी मागावी, अन्यथा अयोध्येत त्यांना पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावरुन बदाच वादंग झाला होता. अखेरीस राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला होता. आता राज ठाकरे यांना असलेला विरोध हा वैयक्तिक नसल्याचं बृजभूषण सिंह सांगत आहेत.”]

वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत

१. २०२२ साली विधानसभा निवडणुकीत त्यांनी सपाला मत म्हणजे पाकिस्तानला मत असे वक्तव्य केले होते.
२. आमच्याच पक्षात कलाम हे राष्ट्रपती होऊ शकतात. कमाल केलीत राष्ट्रपती कसाब असाल तर कापून काढू असंही ते म्हणाले होते.
३. ओवेसी यांचे पूर्वज हिंदू होते, त्यांच्या वडिलांचे नाव तुलसीराम दास होते.
४. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि बिलावल भुट्टो हे एकाच वंशाचे असल्याचे वक्तव्यही केले होते
५. बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर बनावट तूप विकण्याच्या आरोपानेही चर्चेत आले होते.

Web Title: Brijbhushan singh who prevented raj thackeray from coming to ayodhya is now in trouble veteran wrestlers have accused him of sexual abuse nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2023 | 03:53 PM

Topics:  

  • brijbhushan singh
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
2

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
3

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”
4

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.