Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात

Raj Thackeray on Gokul pawer Struggle:सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 06, 2026 | 03:33 PM
Raj Thackeray Gokul Milk Union Post, Raj Thackeray Slams BJP Kolhapur,

Raj Thackeray Gokul Milk Union Post, Raj Thackeray Slams BJP Kolhapur,

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरेंची भाजपवर कडक टीका
  • शासननियुक्त संचालकांवर सवाल
  • महाराष्ट्रात पाण्याचा आणि भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ
Raj Thackeray on Gokul pawer Struggle:  भाजपने गोकुळ दूध संघात रडीचा डाव खेळणं बंद करावं. सरकारचे पाच संचालक का नेमत आहात, त्यांना मतांचा अधिकार का देत आहात, लोकशाहीची बूज राखायची तर मग गोकुळमध्ये हे काय करत आहात?, असे खणखणीत सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सभासदांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडी पॅनेलला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

निवडणुकीनंतर गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकारही दिला जाणार आहे. निवडणुकीनंतर भाजपने टाकलेल्या या डावामुळे सतेज पाटील (Satej Patil) यांच्या समविचारी आघाडीच्या तोंडचा अध्यक्षपदाचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने कोर्टात जाण्याची तयारीही ठेवली आहे. पण गोकुळमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षावरून आता राज ठाकरेही सतेज पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया ट्विटर एक्स अकाऊंटवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आ

भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे 12 विरोधात सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे (म्हणजे तुमचेच) 5 संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार…सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच

भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघाबाबत राज ठाकरे यांनी भाजपवर काय मुख्य टीका केली आहे?

    Ans: सतेज पाटील यांच्या पॅनेलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळूनही, भाजप गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून शासननियुक्त संचालक लादून 'रडीचा डाव' खेळत असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला.

  • Que: राज ठाकरे यांनी भाजपच्या 'लोकशाही वाचवा' मोर्चावर काय विधान केले?

    Ans: "केवळ भाजप हाच असा पक्ष आहे जो सत्तेत असूनही विरोधी पक्षाविरोधात 'लोकशाही वाचवा' मोर्चे काढतो; पण गोकुळमध्ये स्वतःच लोकशाहीची पायमल्ली करतो," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

  • Que: गोकुळ प्रकरणावरून आता कोणकोणते प्रमुख नेते सतेज पाटील यांच्या पाठिंशी उभे राहिले आहेत?

    Ans: काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील सतेज पाटील आणि गोकुळच्या ५.५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

Web Title: Raj thackeray slams bjp over gokul milk union power struggle satej patil as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
1

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?
2

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
3

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
4

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.