Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Raj Thackeray: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप खालपासून वरपर्यंत सत्तेत असूनही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याची टीका त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2026 | 03:27 PM
'...स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील', गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

'...स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील', गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Follow Us
Follow Us:
  • ‘गोकुळमध्ये सत्ता मिळाली नाही म्हणून तत्त्व बाजूला ठेवली’
  • राज ठाकरेंचा भाजपला टोला
  • महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ
Raj Thackeray: महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली असून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपला ‘अजब पक्ष’ असे संबोधले आहे. खालपासून वरपर्यंत सत्तेत असलेला पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचे चित्र विचित्र असल्याची टिप्पणी त्यांनी केली. जगात सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा काढत असल्याचे हे एकमेव उदाहरण असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले राज ठाकरे?

भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले.

पदवीधर निवडणुकीत NDA ची बाजी; पण महाराष्ट्रातील पराभव भाजपच्या जिव्हारी

तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !

रडीचा डाव खेळणं बंद करावं

सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.

भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज ठाकरे यांनी भाजपवर टीका का केली?

    Ans: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी लोकशाहीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली.

  • Que: गोकुळ निवडणुकीत कोणत्या पॅनलचे किती संचालक निवडून आले होते?

    Ans: राज ठाकरे यांच्या पोस्टनुसार, भाजप पॅनलचे १२ आणि सतेज पाटील पॅनलचे १३ संचालक निवडून आले होते.

  • Que: राज ठाकरे यांनी सरकारच्या कोणत्या निर्णयावर आक्षेप घेतला?

    Ans: निवडणुकीनंतर सरकारने पाच संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Web Title: Raj thackeray criticizes bjp gokul controversy democracy march sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • BJP
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आता श्रेयासाठी नेत्यांमध्ये चढाओढ!
1

BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आता श्रेयासाठी नेत्यांमध्ये चढाओढ!

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
2

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’
3

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’

Solapur News: भाजपवर प्रणिती शिंदेंची टीका!चोराच्या उलट्या बोंबा, डेटा सेंटरमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार
4

Solapur News: भाजपवर प्रणिती शिंदेंची टीका!चोराच्या उलट्या बोंबा, डेटा सेंटरमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.